जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च रोजी आबलोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी आबलोली गावातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आबलोली गावातील सर्व महिला भगिनींनी या संपूर्ण कार्यक्रमाला वेळेत आवर्जून उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
महिला जागतिक दिनानिमित्त मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी ०२:०० ते ०३:०० या वेळेत विशेष महिला सभा आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी ०३:०० ते ०३:३० या वेळेत महिलांकरिता आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून डॉ. गौरी काटदरे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ०३:३० ते ०४:०० या वेळेत एकल महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ०४: ००ते ०४:३० या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ०४:३० ते ०५:०० या वेळेत महिलांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ०५:०० ते ०५:३० या वेळेत मान्यवरांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर ०५:०० वाजता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व महिला भगिनी यांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.














