मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

 

रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय सागरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसामुळे आपल्याला सागरी सीमांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समुद्रातील सुरक्षिततेचे महत्त्व यांची जाणीव होते. ‘सागर’ हा राज्याच्या आर्थिक विकासाशी थेट संबंधित आहे. सागर प्रगतीला सक्षम करतात. बंदरे ही देशाच्या आयात-निर्यात व्यापारात मोठा वाटा उचलत असतात. कोकणामध्ये विशेषता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यात हजारो लोक मासेमारीवर अवलंबून आहेत. मत्स्य व्यवसायामध्ये ‘सागरी दिन’ हा दिवस आपल्याला मत्स्य संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांची आवश्यक सुरक्षितता यांची आठवण करून देतो.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेले ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ आणि ‘मे. मरीन सिंडीकेट लिमिटेड, रत्नागिरी’ यांचे संयुक्त विद्यमाने सदर दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी सुद्धा, ‘मरीन सिंडीकेट, रत्नागिरी’; ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’; ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ आणि ‘जलजीविका, रत्नागिरी’ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी ‘सागरी दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्त “राष्ट्रीय सागरी दिन २०२६: सागरी वारसा, संधी आणि शास्वत विकास” या विषयावर एक दिवसीय ‘कार्यशाळा आणि सागरी नौका नयन प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले.

या ‘सागरी दिन’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, त्यानंतर महाराष्ट्र गीत तसेच विद्यापीठ गीत गायनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली; डॉ. एम. एस. चांडगे, माजी सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर; डॉ. दिलीप नागवेकर, माजी प्रमुख, नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी; श्री. प्रमोद कुलकर्णी, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी शहर; श्री. ऋषिकेश भाटकर, जिल्हा समन्वयक सहयोगी, UNDP, GCF, ECIRCC प्रकल्प प्रमुख; तसेच आयोजक मरिनर दिलीप भाटकर, संचालक, मे. मरीन सिंडीकेट लिमिटेड, रत्नागिरी; डॉ. केतन चौधरी, प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी आणि श्रीम. संज्योक्ती सुर्वे, संचालक, मे. मरीन सिंडीकेट लिमिटेड, रत्नागिरी हे उपस्थित होते. यावेळी कोंकण शिल्प मासिकाच्या सागरी दिन निमित्त विशेष अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. केतन चौधरी यांनी समुद्र ही आपल्या कोकणासाठी आणि देशासाठी सुद्धा नैसर्गिक देणगी असून, देशाच्या विकासासाठी महत्वाचा हातभार लावत असून “सक्षम प्रगती” कडे वाटचाल सुरु असल्याचे सांगितले केले. मरिनर दिलीप भाटकर यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये मे. मरीन सिंडीकेट लि. रत्नागिरी तर्फे गेली ३६ वर्षे रत्नागिरी मध्ये ‘सागरी दिन’ साजरा केला जात असून त्यापैकी ३६ वर्षे डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाचे मत्स्य विद्या शाखा आपल्या सोबत असल्याचे आठवण करून दिली. यावर्षी प्रथमच सदर ‘सागरी दिन’ मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे साजरा करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ‘सागरी दिनाचे महात्म्य’ उपस्थतांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, डॉ. बा. सा. कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सागरी दिनाचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी उत्कृष्ट सागरी प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजन बाबत प्रशंसा केली.

मार्गदर्शन व्याख्यानामध्ये प्रथम श्री. राध्येय पंडित, सदस्य, रत्नागिरी माऊंटेनिअर, रत्नागिरी आणि असिम फाउंडेशन, पुणे यांनी ‘रत्नागिरीचा सागरी इतिहास’ यावर मार्गदर्शनपर सादरीकरणासह व्याख्यानात भाटये, रत्न-दुर्ग किल्ला , पेठकिल्ला, जयस्तंभ याबाबत ऐतिहासिक माहिती उपस्थितांना सांगितली. त्यानंतर डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे, झाडगाव, रत्नागिरी यांनी समुद्र शेवाळ चे मानवा करीता महत्व तसेच समुद्र शेवाळ पासून विविध खाद्य पदार्थ तसेच औषधी पदार्थाबाबत माहिती दिली. त्यानंतर, श्री. ऋषिकेश भाटकर, जिल्हा समन्वयक सहयोगी, आणि श्री. चिन्मय दामले, जिल्हा समन्वयक, जलजीविका संस्था, रत्नागिरी यांनी महाराष्ट्र शासन अंतर्गत कांदळवन कक्षाच्या योजनाबाबत माहिती दिली. डॉ. एस. सी. कांबळे, गिअर टेकनीशिअन, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांनी महाराष्ट्र शासनाने ५४ मत्स्य जातींकरीता किमान कायदेशीर आकार (एम.एस.एल.) जाहीर केले आहे, त्याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी शाश्वत मत्स्य व्यवसायाचे महत्व सांगितले. शेवटी श्री. संजीव लिमये, यांनी रत्नागिरीतील सागरी पर्यटन विषयी उपस्थितांना माहिती दिली.

सागरी नौका नयन प्रदर्शन मध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांचे मार्फत विविध सागरी नौका नयन यंत्रे, मच्छीमारी नौका, सागरी सुरक्षा उपकरणे यांचे प्रदर्शन मांडले होते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी यांनी ‘सागरी मत्स्यालय’ प्रदर्शित करून सहभाग नोंदविला, तर २-महाराष्ट्र नेव्हल बटालिअन, रत्नागिरीच्या कॅडेटस नि विविध सागरी नौका आणि जहाजांचे मॉडेल प्रदर्शन मध्ये ठेवले होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. आर.आर. जाधव, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अपूर्वा सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांनी केले. या कार्यशाळेस एकूण ९० विविध मान्यवर, अधिकारी कर्मचारी मत्स्य व्यवसाईक, मच्छिमार बांधव आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता करीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, मा. विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि मा. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम कॅप्टन दिलीप भाटकर, मे. मरीन सिंडीकेट लि. रत्नागिरी आणि डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी; श्रीम. व्ही.आर. सदावर्ते, श्रीम. ए.एन. सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथील डॉ. राकेश जाधव, प्रा. निलेश मिरजकर, प्रा. रोहित बुरटे, श्री. सुशील कांबळे, श्री. पंकज सिडाम, श्री संदेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. जलजीविका, रत्नागिरी येथील श्री. चिन्मय दामले व श्रीम. सृष्टि सुर्वे यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतलेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत आठवडे बाजारही बंद; वाहतुकीस...
Read More
कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता; डिझेलवरील करकपातीसाठी हालचाली...
Read More
इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि जि. प.सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ०६ जून...
Read More
गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश! 🌍 परदेश दौऱ्यावरून परतताच पीएम मोदी ॲक्शन...
Read More
देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!