संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

देवरुख–संगमेश्वर राज्यमार्गावरील धोकादायक वळणावर समोरासमोर धडक; चालकाला केबिनमधून बाहेर काढण्यासाठी थरारक बचावकार्य

संगमेश्वर (प्रतिनिधी):

देवरुख–संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. वळणावर वाहन चालवताना झालेल्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचे एलपी वाहन देवरुखहून संगमेश्वरकडे येत होते. त्याचवेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा एमएच १० सीआर ३४५६ क्रमांकाचा ट्रक समोरून येत होता. लोवले येथील धोकादायक वळणावर एलपी वाहन चालकाने वाहतुकीचे नियम न पाळता वाहन रस्त्याच्या मधोमध आणल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला बाजू देणे शक्य झाले नाही आणि दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.

या धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून बॉक्साईटने भरलेला ट्रक रस्त्याखालील सुमारे पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातात एलपी वाहनाच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) हा केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने धाडसी बचावकार्य करून चालकाला बाहेर काढले.

या अपघातात एलपी चालक बालाजी कोंडेवार आणि ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक तपासानुसार एलपी वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट होत असून पुढील तपास सुरू आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष नवीमुंबई (मंगेश जाधव)बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा...
Read More
लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)-शिवसेना पक्षाची बांधणी युद्धपातळीवर सुरु असून याचाच...
Read More
BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार  रत्नागिरी - जि .प आदर्श...
Read More
 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड प्रतिनिधी :- निलेश रहाटे    कल्याण डोंबिवली...
Read More
भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर ~श्रीराम नाट्य मंडळाचे दिग्गज कलावंत...
Read More
नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी रत्नागिरी - दिनांक १७ मार्च २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब...
Read More
मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात

गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २५व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता...
Read More
गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात

कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी

कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी अवकाळी पाऊस आणि उष्णतेमुळे ९० टक्के हापूस आंबा बागांचे...
Read More
कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी

गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश

गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश वेळणेश्वर: गुहागर तालुक्यातील जलजीवन...
Read More
गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश