नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

गुहागर ~श्रीराम नाट्य मंडळाचे दिग्गज कलावंत व श्रीराम भजनी मंडळाचे भजनी बुवा श्री मारुती हरी रोहीलकर यांनी गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भजनी क्षेत्रांमध्ये फार मोठे योगदान दिले आहे तसेच त्यांनी नाट्य कला जोपासले आहे त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान व शाळा वेलदूर नवानगर मराठीतर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ते ग्राम पंचायत वेलदूरचे सदस्य आहेत तसेच महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे आजीवन सभासद आहेत सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे संत गोरा कुंभार, भालचंद्र असे धरीला , गीता गाती ज्ञानेश्वरी ,प्रीतीसंगम ,मदनाची मंजिरी, संगीत कैकयी ,संगीत सुवर्ण तुला ,संगीत सौभद्र, वज्राघात , वेडी माया ,तुझाच आधार मला, सौभाग्य, पण चूक कोणाची , कालचक्र, देव नाही देव्हाऱ्यात, कन्या सासुरासी जाये, आईची माया, सासुरवास, उभा आंधळा मी अंधारी, काय कमी या संसारी, माझा कोणा म्हणून मी, एखाद्याच

नशीब ,एकच प्याला, मंदिर, सोनेरी नदीचा राजा, अखेरचे अश्रू, कधीतरी कुठेतरी अशा विविध नाटकांमध्ये विविध अंगी भूमिका करून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.ते हरहुन्नरी व हाडाचे कलावंत आहेत.श्रीराम ग्रामस्थ मंडळ नवनगर रोहीलकर वाडी येथे राम नवमी उत्सवामध्ये संगीत श्री रामलीला मध्ये जवळजवळ 30 वर्षे नारदाची भूमिका साकारली आहे .तसेच ते वेलदुर नवानगर शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संगीत विषयासाठी विशेष योगदान देतात .त्यांच्या नाट्य क्षेत्रातील व भजनी क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठी व्यवस्थापन समितीतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.त्यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मुख्याध्यापक मनोज पाटील ,पदवीधर शिक्षक निलेश पाटील ,अफसाना मुल्ला ,धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें