गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट
आबलोली (संदेश कदम) जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी मानव वस्ती कडे येऊ लागले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये प्रचंड घबराट उडाली असून सर्वजण भीतीच्या वातावरणात आहेत. असा प्रकार नुकताच गुहागर तालुक्यातील खोडदे देऊळवाडी- खापलेवाडी -डिंगणकरवाडी रस्त्यावरील कातळांबा जवळ रात्री ०८:०४ वाजता ब्लॅक पॅंथरचे दर्शन झाल्याने प्रचंड घबराट उडाली असून वन खात्याने ब्लॅक पॅंथरचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सर्वेश साळवी व भुषण पवार यांनी दिली. वन्य प्राणी मानव वस्तीकडे येऊ लागल्याने जीवित हाणी होऊ शकते. याकडे वन विभागाने त्वरित लक्ष देऊन ताबडतोब ब्लॅक पॅंथरचा बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.तसेच भीती आणि घबराट ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधी झाला असेल खोडदे येथील प्रगतशील शेतकरी रमाकांत साळवी यांच्या चिरेबंदी वाड्याचा दरवाजा तोडून वाड्यात घुसून वाघाने वासराला मारले होते तरी वन खात्याने ब्लॅक पॅंथरचा ताबडतोब बंदोबस्त करावा तसेच वन खात्याने मोठ्या प्रमाणात जंगल वाढीसाठी त्वरित नियोजन करावे अशी मागणीहि ग्रामस्थांकडून होत आहे.ब्लॅक पॅंथर बद्दलची माहिती सर्वेश साळवी यांनी वन विभागाला दिली आहे.तसेच ब्लॅक पॅंथर चित्रीकरण भुषण पवार यांनी केले.
















