१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

खेड : वार्ताहर (योगेश पेढांबकर)
तालुक्यातील धामणंद गाव येथील वावे काजू फाटा परिसरात मंगळवारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत १२ वर्षीय बालिकेचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. मानसी रामचंद्र कदम (रा. धामणंद, रोहीदासवाडी, ता. खेड) असे मृत बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसी ही मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आपल्या आईसोबत वावे काजू फाटा येथील नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदीत पाणी कमी असले तरी काहीठिकाणी खोल डोह तयार झाले आहेत.
मानसीची आई सौ. रीना रामचंद्र कदम या कपडे धुण्यात व्यस्त असताना मानसी नदीकाठावर खेळत होती.
दरम्यान, खेळताना तिचा अचानक तोल गेला आणि पाय घसरून ती थेट नदीतील खोल डोहात पडली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. हा प्रकार लक्षात येताच आईने आरडाओरडा केला. तिच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी तातडीने नदीत उतरून शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास मानसीला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्या वेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. ग्रामस्थांच्या मदतीने तिला तात्काळ वावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरने तिला पुढील उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
मात्र,उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मानसीला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने तिच्या प्रसंगी कदम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी. एन.एस.एस.१९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेने धामणंद परिसरात शोककळा पसरली आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]