महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

लेखापरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेला मोठी चालना

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल आणि लेखापरीक्षण व्यवस्थेला डिजिटल बळ देणाऱ्या ‘IAW सिंधुदुर्ग’ या आधुनिक वेब अॅप्लिकेशनचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे अंतर्गत लेखापरीक्षण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तसेच सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची उपस्थिती होती.

लोकलेखा समितीच्या शिफारशीनुसार १९७७ पासून कार्यरत असलेल्या अंतर्गत लेखा परीक्षण पथकाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीन असलेल्या १४ कार्यालयांचे महसुली जमेचे लेखापरीक्षण केले जाते. आता या नव्या डिजिटल प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होणार आहे.

या वेब अॅप्लिकेशनद्वारे उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, तहसीलदार तसेच लेखापरीक्षण पथकातील अधिकारी व सहाय्यक अशा एकूण ३६ वापरकर्त्यांना लॉगिन सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल ७४० प्रलंबित परिच्छेदांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली असून, १९८६ सालापासूनची जुनी प्रकरणे देखील सहज पाहता येणार आहेत.

प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, अनुपालन अहवालांचे सुसूत्र सादरीकरण आणि वसुली प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या अॅपमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये संभाव्य वार्षिक दौरे, लेखापरीक्षण सूचनापत्र, तपासणी सूची, स्थायी आदेश, मसुदा अहवाल (ड्राफ्ट), अंतिम अहवाल, ऑनलाईन अनुपालन सादर करण्याची सोय यांचा समावेश आहे.

तसेच मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रगती अहवाल तयार करण्याची सुविधा उपलब्ध असून, पथक सदस्यांच्या दैनंदिनीची नोंद ठेवण्याची सुविधाही या प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल व्यवस्थापन अधिक पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण लेखापरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेला मोठी चालना सिंधुदुर्ग: महाराष्ट्र दिनाचे...
Read More
महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी. नवीमुंबई (मंगेश जाधव) डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप, पनवेलकर संकुल, बदलापूर (पूर्व) यांच्या...
Read More
पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू भाळवणी येथे लग्नसमारंभादरम्यान दुर्घटना; वडिलांना वाचवताना 20...
Read More
सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा चिपळूण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ६ महिन्यांच्या गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर...
Read More
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा