हस्ताक्षर स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश
अभिज्ञा पवार ,कस्तुरी घाणेकर व सृष्टी पालशेतकर प्रथम
आबलोली (संदेश कदम)
कोकण कट्टा आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उपक्रम नुकताच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात संपन्न होऊन इयत्ता पाचवी ते सहावीच्या “अ” गटात अभिज्ञा दिनेश पवार , इयत्ता सातवी ते नववीच्या “ब” गटात कस्तुरी संतोष घाणेकर व अकरावी ते बारावी गटात सृष्टी रुपेश पालशेतकर या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक संपादन केला.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित कोकण कट्टातर्फे इयत्ता पाचवी ते सहावी “अ” गट , इयत्ता सातवी ते नववी “ब” गट व इयत्ता अकरावी ते बारावी या गटात संपन्न झाली. इयत्ता पाचवी ते सहावी “अ” गटात अभिज्ञा दिनेश पवार – ५ वी – प्रथम क्रमांक , स्वरा शैलेश गावडे – ६ वी – द्वितीय क्रमांक , रूची संजय तुप्ते – ५ वी – तृतीय क्रमांक , शौर्य सुजित जोशी – ६ वी व युगा रुपेश किर्वे – पाचवी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. इयत्ता सातवी ते नववी ब गटात कस्तुरी संतोष घाणेकर – आठवी “अ”- प्रथम क्रमांक , गायत्री विश्वास भिडे – नववी “अ” – द्वितीय क्रमांक , ओजस्वी सुधीर वासनिक – नववी “अ” – तृतीय क्रमांक तसेच शमिका योगेश धामणस्कर नववी “वर्ष अ” व अथर्व अनिल घाणेकर – सातवी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. इयत्ता अकरावी ते बारावी गटात सृष्टी रुपेश पालशेतकर – अकरावी कला शाखा – प्रथम क्रमांक , रुपेश उदय माटल – अकरावी कला शाखा – द्वितीय क्रमांक , अनुष्का अनंत धनावडे – अकरावी वाणिज्य शाखा – तृतीय क्रमांक तसेच अमृता अशोक घरवे – अकरावी विज्ञान शाखा व आर्या अशोक ठोंबरे अकरावी वाणिज्य शाखा यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे आयोजक कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातर्फे मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण यांनी अभिनंदन केले.
सदर स्पर्धेसाठी पाटपन्हाळे विद्यालयातील शिक्षक एस.वाय.भिडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच गुहागर तालुक्यातील पालपेणे हायस्कूल , मुंढर हायस्कूल , नातू प्रतिष्ठानचे पाचेरीआगर विद्यालय या विद्यालयांमध्ये सदरची स्पर्धा संपन्न करण्यात आली. स्पर्धेतील सुशस्वी विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे बक्षिसे देऊन महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विद्यालयात गौरव करण्यात आला. तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील अलोक प्रतीक पवार याचे इन्स्पायर अवॉर्ड व उत्कृष्ट विज्ञान प्रतिकृतीसाठी निवड व आली. शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

















