पुण्यात दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहाथ अटकेत

crim

पुण्यात दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहाथ अटकेत

अटक वॉरंट टाळण्यासाठी आधी घेतले होते ५ लाख; पुणे पोलीस दलातील आठवड्यातील तिसरी मोठी कारवाई

पुणे

Pune : भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला वेग देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Koregaon Park Police Station येथील पोलीस हवालदाराला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गणेश शहाजी कस्पटे (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव असून, अटक वॉरंटची कारवाई टाळण्यासाठी त्याने यापूर्वी तब्बल ५ लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीच्या मालकाविरुद्ध Hyderabad न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरण सुरू होते. या प्रकरणात न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले होते. त्या वॉरंटची अंमलबजावणी न करण्यासाठी पोलीस हवालदार गणेश कस्पटे याने ३ मार्च २०२६ रोजी तक्रारदारांच्या मालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

 

यानंतर पुन्हा १ मे रोजी कस्पटे याने वॉरंट परत आल्याचे सांगत संबंधित मालकाला अटक न करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. मालक आजारी असल्याने तक्रारदार स्वतः त्याला भेटले असता, तडजोडीनंतर दोन लाखांवर व्यवहार ठरला. अखेरीस दीड लाख रुपये देण्याचे निश्चित झाल्यानंतर तक्रारदाराने ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

 

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Boat Club Road परिसरात सापळा रचला. बुधवारी दुपारी तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना गणेश कस्पटे याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व त्यांच्या पथकाने केली. सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे पुढील तपास करत आहेत.

 

दरम्यान, पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येताच गणेश कस्पटे याने तक्रारदाराच्या छातीला चावा घेतला तसेच सापळा पथकाला धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली असून, आठवडाभरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेली ही तिसरी मोठी कारवाई ठरली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें