अशोका बिल्डकॉन कंपनी विरोधात कारवाईची मागणी; शेतकऱ्यांच्या जमिनी, आंबा-काजू बागांचे नुकसान, अवजड वाहनांमुळे अपघातांचा आरोप

highlits

गुहागरमध्ये शेतजमीन नुकसानप्रकरणी संताप; शिवस्वराज्य संघटनेचा १० मे रोजी उपोषणाचा इशारा

अशोका बिल्डकॉन कंपनी विरोधात कारवाईची मागणी; शेतकऱ्यांच्या जमिनी, आंबा-काजू बागांचे नुकसान, अवजड वाहनांमुळे अपघातांचा आरोप

गुहागर –

: तालुक्यातील तवसाळ खुर्द परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाल्याचा आरोप करत शिवस्वराज्य शेतकरी संघटनेने तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई न झाल्यास १० तारखेला उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या माहितीनुसार, शेतकरी महिला प्रज्ञा कमलेश पाटील यांच्या शेतजमिनीत संबंधित कंपनीकडून जबरदस्तीने सिमेंटयुक्त व खराब स्वरूपाचे पाणी सोडण्यात आल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नुकसान झालेल्या शेतीबाबत प्रज्ञा कमलेश पाटील यांनी गुहागर तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दिल्याचे समजते.

याशिवाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून काही ठिकाणी प्लांट उभारण्यात आले असून काही भागांत कॉलनीदेखील उभारण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांच्या आंबा व काजूच्या झाडांची तोड करण्यात आल्याचाही आणि प्रकल्प चे काम रात्री ८ वाजताचे आत बंद करण्याच्या अट स्थानिक ग्रामपंचायत ने   लेखी मान्यता दिली  असताना हि रात्री उशिरा पर्यंत काम चालू असते ,त्यामुळे वृद्ध,आजारी व्व्यक्ती ,लहान मुले यांना पुरेशी झोप मिळत नसल्याचा  गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीची अवजड वाहने अबालोलीसारख्या गजबजलेल्या परिसरातून वाहतुकीचे नियम डावलून वेगाने चालवली जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. काही चालक नशेच्या अवस्थेत वाहने चालवत असल्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वाहनांमुळे दुकाने, वीजवाहिन्या तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी विरोध करण्यासाठी गेल्यास त्यांना पोलिसांचा धाक दाखवून परत पाठवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. प्रशासन कंपनीच्या बाजूने काम करत असल्याने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

संघटनेने संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा १० रोजी आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा शिवस्वराज्य संघटनेने प्रशासनाला दिला आहे.


 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें