*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे
आबलोली (संदेश कदम)
पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करणारे गुहागर तालुक्यातील काजुर्ली गावचे सुपुत्र व सध्या गुहागर तालुक्यातील आबलोली येथे स्थायिक झालेले आणि वझे केळकर महाविद्यालय मुलुंड मुंबई येथे प्राध्यापक म्हणून नोकरीत कार्यरत असलेले प्राध्यापक अमोल महादेव पवार यांनी चिपळूण तालुक्यातील मांडकी – पालवण येथील मोरे यांच्यासाठी स्वखर्चाने जाऊन रक्तदान केले आणि त्यांची लगेच शस्त्रक्रिया चालू झाली. प्राध्यापक अमोल पवार यांच्या रक्तदानाचे मोल झाले असून रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. हे प्राध्यापक अमोल पवार यांनी कृतीतून दाखवून दिल्याने गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्राध्यापक अमोल पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
















