सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता १० वी, इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा आणि स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा तसेच एम. एस. सी. आय.टी.च्या परिक्षेला बसणा-या विद्यार्थांचा शुभेच्छा कार्यक्रम सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतचे सरपंच ॲड. प्रतिक पवार हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलीत करुन मान्यवरांच्या हस्ते शारदा मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर एम. एस. सी.आय.टी.उत्तीर्ण विद्यार्थांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर एम.एस.सी.आय.टी. च्या मार्च २०२६ मधील परिक्षेसाठी बसणा-या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते हॉलटीकीट आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी मधील शालांत परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा व स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतचे सरपंच ॲड. प्रतिक पवार, ग्रामविकास अधिकारी श्री.बाबुराव सूर्यवंशी, उद्योजक गजानन साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडीटर जगदीश साळवी, पत्रकार संदेश कदम यांनी विद्यार्थांना मौलिक मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश साळवी यांनी केले तर नीटनेटके सुत्रसंचालन कु.आर्या प्रशांत साळवी हिने केले.
यावेळी विचारपिठावर निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतचे सरपंच ॲड .प्रतिक पवार, ग्रामविकास अधिकारी श्री.बाबुराव सूर्यवंशी,उद्योजक गजानन संदेश साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडिटर जगदीश साळवी,पत्रकार संदेश कदम, आदी. मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौ. सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्रवीण आचरेकर, सिद्धी डिंगणकर, सलोनी मोहिते, विशाखा झगडे यांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले












