आमदार किरण सामंत यांनी पाळला शब्द; नाटे रस्त्याचे डांबरीकरण वेळेत पूर्ण

आमदार किरण सामंत यांनी पाळला शब्द; नाटे रस्त्याचे डांबरीकरण वेळेत पूर्ण

*आमदार किरण सामंत यांनी पाळला शब्द: नाटे रस्त्याचे डांबरीकरण वेळेत पूर्ण, मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण*

राजापूर दि. 21 जून 2026:* “आपला शब्द म्हणजे आपले वचन” या उक्तीची प्रचिती नाटेवासियांना आली असून, आमदार भय्यासाहेब किरण सामंत यांनी दिलेल्या वचनानुसार नाटे गावातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम 20 तारखेपर्यंत पूर्ण केले आहे. डांबराच्या किंमती दुप्पट झाल्यामुळे व डांबर उपलब्ध न झाल्याने रखडलेले हे काम आमदार सामंत यांनी 20 तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून देण्याचे वचन ग्रामस्थांना दिले होते व दिलेल्या शब्दाप्रमाणे 20 तारखेला काम पूर्ण करून आमदारांनी आपले वचन पाळले आहे. नव्याने पूर्ण झालेल्या या रस्त्याचे लोकार्पण तालुकाप्रमुख दीपकजी नागले, सभापती नंदिनी कदम, जिल्हापरिषद सदस्य कोमल नवाळे, विभागप्रमुख नाटे मनोज आडवीरकर, विभागप्रमुख देवाचेगोठणे विनोद शेलार, उपविभागप्रमुख प्रेमानंद कलव, उपविभागप्रमुख चंद्रकांत पड्यार व शाखाप्रमुख विद्याधर कांबळी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महिला उपतालुकाप्रमुख प्राजक्ता पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य प्रांजल लकळे, महिला उपविभागप्रमुख पूजा करगुटकर, महिला शाखाप्रमुख प्रतीक्षा साखरकर, मनीषा पाटील, संतोष चव्हाण, पुरुषोत्तम थळेश्री, चंद्या मिराशी, बाबू नागवेकर, अनिल ठाकरे, राजवाडी सरपंच अजित बंडबे, धनेश्वर खाडये, सुनील करगुटकर, विश्वास करगुटकर, साखरीनाटे शाखाप्रमुख अल्ताफ भाटकर, आदिल म्हसकर, शकशील कोतवडकर, दिपक पावसकर, अजय बंदरकर, पारकर मॅडम, सुनील पाध्ये, रोशन डुगीलकर, सोन्या थळेश्री, अनंत बांदकर, तुषार बंडबे, देवेंद्र करगुटकर, अंजल पावसकर यांच्यासह अन्य शिवसेना कार्यकर्ते व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. याबद्दल नाटेवासियांच्या वतीने शिवसेना विभागप्रमुख मनोज आडवीरकर यांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले असून कृतज्ञता व्यक्त केली आहे. आमदारांच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. डांबराच्या तुटवड्यावर मात करून वेळेत काम पूर्ण केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आमदार सामंत यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


— रत्नागिरी वार्ताहर | डिजिटल बातमी पत्र

बातमीदार -प्रशांत पोवार, राजापूर 

 

SEO Keywords:

नाटे रस्ता डांबरीकरण, राजापूर बातमी, आमदार किरण सामंत, रत्नागिरी न्यूज, कोकण बातम्या, नाटे ग्रामस्थ, रस्ता विकास कामे, शिवसेना रत्नागिरी.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें