कुटगिरी गावाची सुकन्या कु. प्रगती दिलीप खेतले हीचे एल.एल.बी परीक्षेत उज्वल यश
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावाच्या इतिहासात मानाचा तुरा स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप तुकाराम खेतले यांचे ज्येष्ठ बंधू दिलीप तुकाराम खेतले यांची सुकन्या कु. प्रगती दिलीप खेतले हिने एल.एल.बी. परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.
कु. प्रगती दिलीप खेतले हिने सिद्धयोग लॉ कॉलेज खेड येथे विद्यापीठाची एल.एल.बी.ची पदवी प्राप्त करून वकील झाली आहे.
अतिशय खडतर प्रवास करून तिनेही पदवी प्राप्त केली आहे. कु. प्रगती दिलीप खेतले हिने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल संपूर्ण गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून तीला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या शुभेच्छा कार्यक्रमाला गावठाण वाडीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ तसेच महिला मंडळ यांच्यासह लहान मुलेही बहुसंख्येने उपस्थित होती.











