उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; सचिन अहिर यांचा शिंदेसेनेत प्रवेश
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सचिन अहिर यांनी महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
काही वर्षांपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने उद्धव ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.















