आरक्षण उपवर्गी करणाच्या विरोधात रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा गुहागर तहसीलदार कार्यालय येथे २४ रोजी निवेदन व भव्य निदर्शने कार्यक्रम

highlits

*आरक्षण उपवर्गी करणाच्या विरोधात रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा गुहागर तहसीलदार कार्यालय येथे २४ रोजी निवेदन व भव्य निदर्शने कार्यक्रम*

आबलोली (संदेश कदम)

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड, उपवर्गीकरणाद्वारे विभाजन करण्याचा कुटील डाव शासनाचा असून सामाजिक न्याय संविधानातील समता, स्वातंत्र व बंधुता या तत्वांचा शासनाला विसर पडल्यामुळे आणि भारतीय संविधान बचावासाठी तसेच आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात निवेदन व भव्य निदर्शने कार्यक्रम करण्यासाठी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी 11: 00 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर राजकीय पक्षाद्वारे गुहागर तालुक्यातील सर्व समाज घटकांना, धार्मिक संघटनांना तसेच विविध पक्षांच्या घटकांना एकत्रित घेऊन गुहागर तहसीलदार कार्यालय येथे भव्य निवेदन आणि भव्य निदर्शने करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक ,धार्मिक आणि संघटना तसेच बहुजन समाजातील बंधू आणि भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर या पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप शंकर कदम, सरचिटणीस सुनील महादेव गमरे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें