पाटपन्हाळे महाविद्यालयात महिला उद्योजकांचा सत्कार सोहळा संपन्न

पाटपन्हाळे महाविद्यालयात महिला उद्योजकांचा सत्कार सोहळा संपन्न

 

वाणिज्य मंडळाचे देखील उदघाटन

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य मंडळाचे उदघाटन करण्यात आले आणि या उदघाटन प्रसंगी गुहागर तालुक्यातील विविध क्षेत्रातील सहा यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या श्रीमती वसुधा जोग (जोग आजी), मीरा गाडगीळ (गुहागर), अनुजा देव (वेळंब), सौ. योगिता सोमण (तळवली), सौ. नम्रता भेकरे, कु. स्नेहा भेकरे (कोतळूक) यांचा समावेश होता. या सर्व यशस्वी महिलांनी गुहागर तालुक्याच्या आर्थिक विकासात चांगले योगदान दिल्याबद्दल आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यामध्ये उद्योजकतेचे गुण विकसित व्हावे यासाठी महिला उद्योजकांचा सत्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. या सर्व यशस्वी उद्योजिकांना वाणिज्य विभागातर्फे शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई यांनी या सर्व महिलांचे कौतुक करून गुहागर सारख्या ग्रामीण भागात राहून देखील व्यवसायाच्या खूप मोठ्या संधी आहेत याचा विचार विद्यार्थ्यांनी नक्कीच करावा अशी आवाहन केले. तसेच मुंबईची कास न धरता गुहागर तालुक्यामध्ये राहूनच आपल्याला उद्योजकतेची मोठी संधी मिळू शकते आणि आपण स्थानिक पातळीवर अनेक रोजगार निर्माण करणारे उद्योजक होऊ शकतो हे सांगितले. या कार्यक्रमांमध्ये जोग आजी, मिरा गाडगीळ, अनुजा देव आणि कु. स्नेहा भेकरे यांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले आणि उद्योजक या नात्याने त्यांचा घडलेला व्यवसायाचा प्रवास आलेल्या अडथळे याबाबत माहिती दिली. याच कार्यक्रमात महाविद्यालयाच्या यावर्षीच्या वाणिज्य मंडळाचे उदघाटन करण्यात आले. वाणिज्य मंडळातील असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या यशस्वी उद्योजकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून कुमारी जान्हवी विचारे यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. सुभाष घडशी, कांचन कदम त्रिशला साबळे, ग्रंथपाल धनंजय गुरव आणि मोठ्या विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्राध्यापक कांचन कदम मॅडम यांनी तर समारोप वाणिज्य मंडळाचे सदस्य कु. प्रणया गावडे यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें