जि. प. आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी’ येथे आषाढी दिंडी सोहळा

‘ *जि. प. आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी’ येथे आषाढी दिंडी सोहळा*

*खंडाळा प्रतिनिधी :- निलेश वि रहाटे*

आषाढी एकादशीचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे ‘आषाढी दिंडी सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यावर्षीच्या दिंडी सोहळ्याची संकल्पना केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाच्या नवभारत साक्षरता अभियानावर आधारित होती. म्हणूनच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी या धार्मिक उत्सवाचा मिलाफ ‘नवभारत साक्षरता अभियान’ या सामाजिक संकल्पनेशी घालण्यात आला होता.

सकाळी शाळेच्या आवारातून विठू माऊलीच्या जयघोषात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या गजरात दिंडीला सुरुवात झाली. परंपरेनुसार विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि हातात टाळ-मृदंग घेऊन अभंग गाणारे विद्यार्थी यामुळे संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले होते. विठ्ठल-रुक्मिणी आणि इतर संतांच्या वेशातील बालरूपांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विठ्ठल भक्तीसोबतच समाज प्रबोधनाचा दिलेला संदेश. सध्या भारतभर ‘नवभारत साक्षरता अभियान’ उत्साहात सुरू आहे. याच अनुषंगाने नवभारत साक्षरता या संकल्पनेवर आधारित विविध फलक हातात धरून विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांमध्ये साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. विविध घोषवाक्ये यांनी नटलेल्या सर्वच पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा – वसा घेतला साक्षरतेचा, अबीर गुलाल उधळीत रंग, नवभारत साक्षर करण्यात आम्ही दंग असे अनेक असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. श्री चव्हाटेश्वर मंदिर ते प्राथमिक शाळा या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत करत जयघोष केला. वारकरी रूपातील चिमुरड्यांचे कौतुक करत नागरिकांनी दिंडीचे दर्शन घेतले. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी विविध अभंग, विविध गाणी म्हणत फुगडी, फेर, रिंगण धरत या आषाढी दिंडीचा उत्साह वाढविला.

यावर्षीच्या नवभारत साक्षरता या संकल्पनेवर आधारित आषाढी दिंडीचे नियोजन गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख मिनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि सहकारी शिक्षिका पुनम कुलकर्णी यांनी केले. या दिंडीच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समिती तथा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे यांच्या पुढाकाराने व्यवस्थापन समितीचे सदस्य उदय रहाटे, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, अंगणवाडी मदतनीस समीक्षा घवाळी, रिया तांबटकर, रुणाली तांबटकर, वेदिका धनावडे, समीक्षा तांबटकर, नुतन रहाटे मानवी तांबटकर, वेदा कुर्टे, दिव्यता तांबटकर, अश्विनी कुर्टे यांच्यासह पालक, समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. यावेळी उपस्थितांना दिंडीचे महत्व आणि नवभारत साक्षरता अभियानाची माहिती देण्यात आली. या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. भक्ती आणि सामाजिक कर्तव्याची सांगड घालणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें