पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘स्वच्छ कामोठे – हरित कामोठे’चा संकल्प; निसर्गप्रेमी संस्थेचा पुढाकार

प्रतिनिधी (मंगेश जाधव):

भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निसर्गप्रेमी संस्था, कामोठे यांच्या वतीने सेक्टर ३१ येथील उद्यान परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान अतिशय उत्साहात पार पडले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या अभियानात कामोठेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपक्रमादरम्यान उद्यानात विविध रोपांची लागवड करण्यात आली, तसेच उद्यान व परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता रोपे जगवण्याचा आणि परिसर सुंदर ठेवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश

“एक झाड म्हणजे भविष्यातील शुद्ध हवा, सावली आणि निरोगी जीवनाची हमी आहे. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश या वेळी आयोजकांनी दिला.

मान्यवरांची उपस्थिती

या अभियानात निसर्गप्रेमी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील कर्पे सर, समाजसेवक श्री सुरेशजी खरात, श्री दशरथ भंडारी, श्री बारणाबास पापू, श्री चंद्रकांत उभारे, श्री सिंग गुरुशरण, श्री लगड सुनील, श्री जगदीश पाटील, श्री मयूर भेंडे व श्री जयप्रकाश जगताप यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें