गुहागरच्या तवसाळ बाबरवाडीत ग्रामस्थांचे श्रमदान; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उभारला बंधारा

गुहागरच्या तवसाळ बाबरवाडीत ग्रामस्थांचे श्रमदान; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उभारला बंधारा

पाणी संवर्धनासाठी महिला मंडळ आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेचा आदर्श उपक्रम

गुहागर – तवसाळ  

यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या शक्यतेवर मात करण्यासाठी मौजे तवसाळ, बाबरवाडी येथील ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी ग्रामस्थ व महिला मंडळाच्या उत्स्फूर्त श्रमदानातून एका नवीन बंधाऱ्याची बांधणी करण्यात आली आहे.

या सामाजिक उपक्रमात बाबरवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक जोशी, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप जोशी, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तसेच मुंबईहून आवर्जून दाखल झालेले सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. सिद्धेश्वर लेंडवे यांनीही प्रत्यक्ष श्रमदान करत या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले. या कामासाठी श्री. राजेश जोशी यांनी ३०० पिशव्या उपलब्ध करून देत महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले.

गावाच्या भविष्यातील पाण्याची गरज ओळखून सर्वांनी एकजुटीने राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यामध्ये महिला मंडळाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घेतलेला सहभाग अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून गावाच्या विकासाचा व जलसंवर्धनाचा उत्तम आदर्श बाबरवाडीच्या ग्रामस्थांनी घालून दिला आहे.

या यशस्वी उपक्रमाबद्दल प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळाचे सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे श्री. दीपक जोशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

“चला, पाण्याचा प्रत्येक थेंब अडवूया!

💧 पाणी अडवा, पाणी जिरवा!

💧 जलसंवर्धन हीच काळाची गरज!

>

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें