गुहागर पंचायत समितीच्या दि. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आमसभेसाठी ६१ अर्ज दाखल

*गुहागर पंचायत समितीच्या दि. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आमसभेसाठी ६१ अर्ज दाखल

आबलोली (संदेश कदम)

गुहागर पंचायत समितीच्या मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी पाटपन्हाळे येथील पूजा मंगल कार्यालय येथे होणाऱ्या आमसभेसाठी ६१ अर्ज दाखल झाले आहेत.आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर पंचायत समिती आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या वर्षभराच्या कामकाजावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ६१ अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये मागण्यांचीच भर अधिक असून सर्वाधिक अर्ज जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहेत .या अगोदर २००९ पासून पंचायत समिती आमदार भास्कर जाधव यांच्या विचारसरणीची होती. मात्र मार्च २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पंचायत समितीवर शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे.परिणामी यावेळची आमसभा नक्की कोणत्या दिशेला वळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमसभेमधून पंचायत समितीच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला जातो. गत आमसभेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व नवीन ध्येय धोरणे ठरवली जातात. यासाठी जनतेकडून हरकती व सूचना मागवल्या जातात. याप्रमाणे तालुक्यातून एकूण ४६ अर्ज आहेत. तर मुदतीनंतर आलेले एकूण १५ अर्ज आहेत. यातील काही अर्जाना उत्तरे देण्याचा प्रयत्न पंचायत समिती प्रशासन, लोकप्रतिनिधी व आमदार यांच्याकडून होतो. तर काही महत्त्वाचे विषय आमसभेमधून थेट चर्चिले जातात.

जि.प. सह सार्वजनिक बांधकाम विभागा संबंधित अधिक अर्ज आहेत.दाखल झालेल्या ६१ अर्जापैकी जिल्हा परिषद बांधकामवर १३ अर्ज दाखल झाले आहेत. सार्वजनिक बांधकामवर ७, महावितरणवर ८, शिक्षण विभागावर ४, आरोग्य, भूमी अभिलेख व महाराष्ट्र परिवहनवर प्रत्येकी ३ अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित तालुका कृषी, जलसंधारण, ग्रामपंचायती विभाग, जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा आदी विभागांवर प्रत्येकी १ ते २ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जामध्ये रस्ते, सभागृह, शाळांमध्ये सुविधा व शिक्षक, नळ पाणीपुरवठा योजना आदी मागण्या आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें