साटवली गांगोवाडी येथे ‘चारा साक्षरता अभियान’ व अझोला निर्मिती प्रात्यक्षिक शिबीर उत्साहात संपन्न

साटवली गांगोवाडी येथे ‘चारा साक्षरता अभियान’ व अझोला निर्मिती प्रात्यक्षिक शिबीर उत्साहात संपन्न

 

लांजा प्रतिनिधी -जितेंद्र चव्हाण 

तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय, लांजा यांच्या वतीने ‘चारा साक्षरता अभियान’ अंतर्गत साटवली गागोवाडी येथे निकृष्ट चारा सकस करणे आणि अझोला वनस्पती तयार करणे याबाबत विशेष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास डॉ. अनुसे (सहाय्यक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन अधिकारी) आणि डॉ. शिरकर (पशुधन विकास अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान पशुधन अधिकारी संदीप खरात यांनी भाताच्या पेंढ्यावर युरिया प्रक्रिया करणे आणि अझोला चारा निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरात देण्यात आलेली प्रमुख माहिती व प्रात्यक्षिके:

भाताच्या पेंढ्यावर युरिया प्रक्रिया (निकृष्ट चारा सकस करणे):

पेंढ्याची पोषकता वाढते व प्रथिनांचे प्रमाण वाढून जनावरांचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.

चारा अधिक पचनीय होतो, जनावरांचे आरोग्य सुधारते आणि कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.

श्री. संदीप खरात यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवले.

अझोला चारा निर्मिती प्रात्यक्षिक:

अझोला हा उच्च प्रथिनयुक्त व पौष्टिक चारा असून यामुळे दूध उत्पादन व जनावरांची प्रजनन क्षमता वाढते.

कमी जागेत व कमी खर्चात निर्मिती करता येत असल्याने हा एक पर्यावरणपूरक व शाश्वत उपाय आहे.

याची लागवड व संगोपनाचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. 

“समृद्ध शेतकरी – पोषित जनावरे – भरघोस दूध उत्पादन” हे ब्रीद वाक्य डोळ्यांसमोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला आणि प्रात्यक्षिकांना साटवली परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें