*हेदवी गावातील नदीवरील बंधाऱ्याची भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडून पाहणी; आर्थिक मदतीचाही हातभार 
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील हेदवी येथे नदीवर बंधारा बांधण्याचे काम सुरू असून, या कामाची भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सन्माननीय सतीश मोरे यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी बंधाऱ्याच्या कामाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांकडून जाणून घेतली. तसेच बंधाऱ्याची आवश्यकता, सुरू असलेले काम आणि ग्रामस्थांच्या अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा केली. या उपक्रमाला हातभार लावत सतीश मोरे यांनी आर्थिक मदतही केली.
या पाहणी नंतर गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अभय दादा भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम तालुकाध्यक्ष सन्माननीय गणेशजी हळदे, पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी बंधाऱ्याच्या कामाची माहिती दिली. सतीश मोरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.












