जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सांडेलावगण येथे आषाढी एकादशीनिमित्त “साक्षरता दिंडी” व “पालखी मिरवणूक” कार्यक्रम

*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सांडेलावगण येथे आषाढी एकादशीनिमित्त “साक्षरता दिंडी” व “पालखी मिरवणूक” कार्यक्रम

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सांडेलावगण शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम केंद्र शाळा सांडेलावगणचे केंद्रप्रमुख श्री. पुंडलिक पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. महेश चंद्रकांत पाष्टे, उपाध्यक्ष सौ प्राजक्ता प्रभाकर घाटे, मुख्याध्यापिका सविता नथुराम म्हेत्रे मॅडम, शाळेतील शिक्षक श्री अरविंद शिवराम महाकाळ सर, श्री चैतन्य सुनील कुलकर्णी सर, स्वयंसेविका सौ. चित्रा अनिल गद्रे मॅडम अंगणवाडी कर्मचारी सौ. शिल्पा शरद जोग मॅडम, सौ मानसी मनोहर बेनेरे मॅडम (माजी सरपंच),स्वयंपाकी मदतनीस श्रीमती दर्शना दत्ताराम महाकाळ मॅडम,शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक श्री. संजय बेनेरे, श्री. सागर घाणेकर, श्री. विकास पाष्टे, सौ. आदिती पष्टे सौ. अर्पिता घाणेकर या सर्वांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते तुळशी पूजन व पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेबाहेर रिंगण घेऊन गावात शिक्षणाच्या जनजागृतीसाठी ‘साक्षरता दिंडी’ एकत्र काढण्यात आली. विद्यार्थी व विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
अशाप्रकारे भक्तिमय वातावरणात “पालखी मिरवणूक” व “साक्षरता दिंडी” हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें