कणकवलीत नाना शंकरशेठ पुण्यतिथी उत्साहात; दैवज्ञ समाजाच्या दैवज्ञ भवन उभारणीचा संकल्प

highlits

कणकवलीत नाना शंकरशेठ पुण्यतिथी उत्साहात; दैवज्ञ समाजाच्या दैवज्ञ भवन उभारणीचा संकल्प

डॉ. विनय शिरोडकर यांचे एकतेचा संदेश; गुणवंत विद्यार्थी, व्यावसायिक आणि महिला स्पर्धा विजेत्यांचा सन्मान

कणकवली | प्रतिनिधी :

सामाजिक उपक्रमांमधून समाजात एकोपा निर्माण होतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव जागृत होते. तरुणांची ऊर्जा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन एकत्र आले तर कोणताही संकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनय शिरोडकर यांनी केले.

दैवज्ञ हितवर्धक समाज, कणकवली यांच्या वतीने नाना जगन्नाथ शंकरशेठ (नाना शंकरशेठ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमित मंगल कार्यालय, कणकवली येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन तसेच नाना शंकरशेठ, संत नरहरी सोनार आणि भालचंद्र महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कणकवली नगरसेवक संजय कामतेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, दैवज्ञ हितवर्धक समाजाचे अध्यक्ष मोहन तळगावकर, विलास जामसंडेकर, ज्येष्ठ सुवर्णकार सुरेश मालडीकर, दत्तात्रय हिर्लेकर, संतोष कुडाळकर, तनय पावसकर, सुधीर कुबल, निकेत पावसकर, सुप्रिया महाजन, अरविंद शिरोडकर, मधुकर मालडीकर तसेच दैवज्ञ महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. विनय शिरोडकर यांनी समाजातील दुरावा दूर करून एकजूट वाढविण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सातत्य, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी गजानन महाजन, निकेत पावसकर आणि सुप्रिया महाजन यांनी नाना शंकरशेठ यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात दैवज्ञ समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी तसेच व्यावसायिकांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजाच्या कार्यकारी मंडळ, महिला मंडळ आणि युवा मंचाच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

संजय कामतेकर, रघुनाथ कारेकर, हेमंत मालंडकर, सुरेश मालडीकर, संतोष कुडाळकर, दत्तात्रय हिर्लेकर, दीपक बेलवलकर, तेजश्री महाजन आणि वर्षा बेळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कनेडी, नाटळ, तळेरे, खारेपाटण, वैभववाडी, फोंडा, सावडाव आणि नांदगाव येथून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेतील विजेत्यांनाही रोख पारितोषिक, भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन तळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धेश डिगसकर आणि चंद्रहास हिर्लेकर यांनी केले, तर आभार सतीश मसुरकर यांनी मानले.

: दैवज्ञ भवन उभारणीचा संकल्प

कणकवली येथे स्वतंत्र दैवज्ञ भवन उभारण्याचा संकल्प यावेळी सर्व समाजबांधवांनी केला. पुढील वर्षीचा नाना शंकरशेठ पुण्यतिथी कार्यक्रम स्वतःच्या दैवज्ञ भवनात आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा डॉ. विनय शिरोडकर यांनी केली. याचवेळी दैवज्ञ भवन बांधकाम समितीचीही घोषणा करण्यात आली.

> “प्रत्येकाने स्वतः पुढे येऊन समाजासाठी काम केले पाहिजे. समाज एकसंघ राहिला तरच आपण सर्वजण पुढे जाऊ शकतो. समाजाची साथ असेल तर कोणतीही वाट अवघड राहत नाही.”

— संजय कामतेकर, नगरसेवक, कणकवली


छायाचित्र  :

1. कणकवली हितवर्धक समाज यांच्यावतीने आयोजित नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनय शिरोडकर दिसत असून बाजूला अन्य मान्यवर उपस्थित होते.

2. कणकवली हितवर्धक समाज यांच्यावतीने आयोजित नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन डॉ. विनय शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.छाया : विनोद दळवी, कणकवली

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें