कोकण विभागीय मंडळ सचिवांची तळवली हायस्कूलला भेट

कोकण विभागीय मंडळ सचिवांची तळवली हायस्कूलला भेट

दहावी बोर्ड परीक्षा केंद्राच्या निकषांची व भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी; प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन

तळवली (प्रतिनिधी – मंगेश जाधव) : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली, ता. गुहागर या प्रशालेस कोकण विभागीय मंडळाच्या सचिव मा. पुनिता गुरव मॅडम व इतर अधिकाऱ्यांनी शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी भेट दिली.

यावेळी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रासाठी आवश्यक असलेल्या विविध निकषांची पूर्तता झाली आहे का, तसेच परीक्षा केंद्रासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, याची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशालेतील सुविधांची सखोल माहिती घेत परीक्षा केंद्राच्या अनुषंगाने आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या भेटीदरम्यान प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांनी कोकण विभागीय मंडळाच्या सचिव सौ. पुनिता गुरव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शिंदे मॅडम, पंचायत समिती विषय तज्ञ सौ. मोहिते मॅडम आणि गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. गोरीवले सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें