रत्नागिरी जिल्ह्यातील औषध विभागाकडून राजापूर मधील आपल्या मर्जीतील डॉक्टरांना अभय, प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन

*रत्नागिरी जिल्ह्यातील औषध विभागाकडून राजापूर मधील आपल्या मर्जीतील डॉक्टरांना अभय, प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन

 

*औषध आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम मधील शेड्युअल “के”चा दुरुपयोग,अपील दाखल

 

*समिर शिरवडकर- रत्नागिरी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग रत्नागिरी यांच्याकडून राजापूर तालुक्यातील आपल्या मर्जीतील डॉक्टरांना मेडिसिन बाबत अभय अश्या आशयाची बातमी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी माहिती अधिकार महासंघाचे काही पदाधिकारी, पत्रकार आणि सहाय्यक आयुक्त (औषध )शशीकांत यादव यांच्या सोबत एक बैठक पार पडली,या बैठकीत मर्जीतील डॉक्टरांचे काही पुरावे, कागदपत्रे तक्रारी सहित सहाय्यक आयुक्त (औषध) यांच्याकडे सादर करण्यात आले. त्याचबरोबर राजापुर तालुक्यातील मेडिसिन वितरकांकडून काही डॉक्टरांना होणाऱ्या औषधांच्या काळया बाजारा बाबत सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली.यावर माहिती घेऊन ती माहिती आपल्याला पुरविण्यात येईल असे अस्वस्थ केले आहे.

याच विषयी काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील डॉक्टर,मॅडिसन आणि मेडिकल बाबत माहिती मागवली असता, माहिती समाधान कारक नसल्याने आयुक्त ,कोकण विभाग अन्न व औषध प्रशासन ठाणे यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले आहे.तरी या सर्व प्रकरणात रत्नागिरी अन्न आणि औषध प्रशासन व कोकण विभाग काय कारवाई करतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें