पाचेरी सडा येथे बंद घरात बिबट्या आढळला; उपचाराआधीच मृत्यू

पाचेरी सडा येथे बंद घरात बिबट्या आढळला; उपचाराआधीच मृत्यू

 

: विठ्ठल डिंगणकर यांच्या बंद घराच्या पडवीत अशक्त अवस्थेत आढळला बिबट्या; उपासमारीचा प्राथमिक अंदाज, वनविभागाकडून तपास सुरू

 

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथे विठ्ठल डिंगणकर यांच्या बंद घराच्या पडवीत अशक्त अवस्थेतील बिबट्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रात्रभर बंद घरात अडकून राहिलेल्या या बिबट्याचा बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला.

 

पाचेरी सडा हा गुहागर तालुक्यातील अत्यंत ग्रामीण भाग असून या परिसरात मानवी वस्ती तुलनेने विरळ आहे. वाडीतील ग्रामस्थांना बंद घराच्या पडवीत बिबट्या असाहाय्य आणि अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून आला. अचानक बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.

 

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बिबट्याची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. रात्रभर बंद जागेत अडकून राहिल्याने त्याला काहीही खाता आले नसावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

उपासमारीमुळे प्रकृती खालावल्याचा प्राथमिक अंदाज

 

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिकदृष्ट्या उपासमारीमुळे बिबट्याची प्रकृती खालावली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आवश्यक तपासणी करण्यात येत असून, उपासमारीमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, हे अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.


SEO Keywords: गुहागर तालुक्यात बिबट्या, पाचेरी सडा बिबट्या, बंद घरात बिबट्या, गुहागर बिबट्याचा मृत्यू, रत्नागिरी बिबट्या, वनविभाग, पाचेरी सडा वन्यजीव घटना

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें