समाजोपयोगी उपक्रमांनी शिक्षक निसर्गप्रेमी सुनील कर्पे यांचा सुवर्णमहोत्सवी ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा

समाजोपयोगी उपक्रमांनी शिक्षक निसर्गप्रेमी सुनील कर्पे यांचा सुवर्णमहोत्सवी ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा

: वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि सामाजिक कार्यासाठी मशीनची भेट; वाढदिवसाला समाजाभिमुखतेची प्रेरणादायी दिशा

नवी मुंबई (मंगेश जाधव) : निसर्गप्रेमी शिक्षक तथा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले कामोठे येथील शिक्षक श्री. सुनील कर्पे यांच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वाढदिवसानिमित्त ११ ऑगस्ट २०२६ रोजी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाज आणि पर्यावरणासाठी योगदान देत त्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसानिमित्त सकाळी ९ वाजता सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमातून निसर्गाप्रती असलेली बांधिलकी जपण्यात आली.

यानंतर दुपारी १ वाजता दि. बा. पाटील विद्यालय, कामोठे येथे विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक पॅडचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

तसेच कामोठे परिसरातील सामाजिक व पर्यावरणपूरक कामांसाठी आवश्यक असलेली खड्डे खोदण्याची मशीन भेट देण्यात आली. या साधनामुळे परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांना निश्चितच मदत होणार आहे.

वाढदिवसाला समाजसेवेची जोड

“वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा दिवस असावा,” या विचारातून सुनील कर्पे सर यांनी आपल्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हे उपक्रम राबविले. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि सामाजिक कार्यासाठी आवश्यक साधनांची भेट अशा विविध उपक्रमांमुळे त्यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी पद्धतीने साजरा झाला.

या उपक्रमातून “वाढदिवस साजरा करण्याची एक नवी आणि समाजाभिमुख दिशा” समाजासमोर आली असून, सुनील कर्पे सर यांच्या सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें