पहिल्या श्रावण सोमवारी साटवलीचे ‘श्री देव केदारलिंग’ मंदिर भक्तीरसात न्हाऊन निघाले! सकाळपासूनच भाविकांची गर्दी; लिंगायत गुरव यांच्या हस्ते धार्मिक विधी व दुग्धाभिषेक

पहिल्या श्रावण सोमवारी साटवलीचे ‘श्री देव केदारलिंग’ मंदिर भक्तीरसात न्हाऊन निघाले!

सकाळपासूनच भाविकांची गर्दी; लिंगायत गुरव यांच्या हस्ते धार्मिक विधी व दुग्धाभिषेक.

लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण 

पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून साटवली येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध श्री देव केदारलिंग (धनि-केदारलिंग) मंदिरात आज भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच देवाच्या दर्शनासाठी साठवलीसह आसपासच्या गाव-तालुक्यातून भाविकांची मोठी एजा सुरू होती. दिवसभर चाललेल्या या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण साठवली परिसर भक्तीमय वातावरणात उजळून निघाला आहे.

श्रावण सोमवारी श्री देव केदारलिंगाचे दर्शन घेण्याचे विशेष महत्त्व असल्याने सकाळीच शिवलिंगावर पवित्र दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला. मंदिरातील लिंगायत गुरव यांच्या हस्तकामाने व धार्मिक परंपरेनुसार विधीवत पूजा-अर्चा पार पडली. शिवलिंगावर बेलपत्र, फुलांची सुंदर आरास आणि धूप-दीपाच्या सुगंधाने मंदिर परिसर अतिशय प्रसन्न झाला होता.

लहान-थोर, अबालवृद्ध दर्शनात तल्लीन:

दर्शनासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच रांगा लावल्या होत्या. श्री केदारलिंग देवाच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांततेसाठी प्रार्थना केली. अनेक भाविकांनी पूर्वी बोललेले नवस फेडण्यासाठी, तर काहींनी नवीन नवस बोलण्यासाठी मंदिरात हजेरी लावली होती.

साठवली गाव झाले भक्तीमय:

विविध गावांमधून आणि ग्रामीण भागांतून येणाऱ्या भाविकांच्या रांगांमुळे मंदिराच्या प्रांगणात आणि साटवली गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे. “हर हर महादेव”, “जय केदारलिंग” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांच्या सोयीसाठी आणि दर्शन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक नागरिक व ग्रामस्थ विशेष सहकार्य करत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें