*जि. प. आदर्श शाळा पाली नं. 1आणि पाली ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाली नं. 1 आणि पाली ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. हे आरोग्य शिबीर आणि नेत्र तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाली नं. 1 आणि निर्मल ग्रामपंचायत पाली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली, उपकेंद्र सुरळ यांनी मौलिक सहकार्य केले.
या आरोग्य शिबिरात महिला – पुरुष यांची रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर तपासणी करून त्यावर औषधे – गोळ्या वाटप करण्यात आल्या. तसेच या शिबिराचा पाली गावातील जवळ जवळ शंभर लोकांनी मोफत लाभ घेतला. तसेच श्री. समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था चिपळूण यांच्यावतीने या आरोग्य शिबिरात सर्व ग्रामस्थांचे डोळे मोफत तपासून त्यांना चष्मा माफक दरात देण्याचे कबूल करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच अरुणशेठ पेजले, उपसरपंच गमरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांतशेठ नलावडे, पोलीस पाटील स्तुती नलावडे, मुख्याध्यापक गुडेकर सर, उपरीकर सर, श्रीमती. भामरे मॅडम पठाण सर, अक्षय गडगे, सौरभ पांगत, सुभाष धामोडे, पुरोहित, मोरे, आरोग्य सेविका श्रीमती. नीलम शिंगे, सौ. मोहिते, पाटील, अजित सुतार, नेत्रतज्ञ सुधीर पवार, आदित्य पेढामकर, आशाताई सौ. मंजुश्री फटकरे, सौ. योगिता पेजले, अंगणवाडी सेविका यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदीपजी नितोरे यांनी सर्वांसाठी चहा,नाष्ट्याची व्यवस्था केली होती.









