गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानची विशेष बससेवा

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानची विशेष बससेवा

कुटगिरी-पाभरे परिसरातील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा; प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी : मंगेश जाधव

गुहागर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय व्हावी, यासाठी गुहागर तालुक्यातील स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची विशेष बससेवा आयोजित करण्यात आली. कुटगिरी-पाभरे परिसरातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष बससेवा रवाना करण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. उत्सवाची सांगता झाल्यानंतर मुंबईकडे परतीचा प्रवास करताना प्रवाशांना वाहतुकीची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर व्हावा, या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तुकाराम खेतले, प्रतिष्ठानचे सदस्य, हितचिंतक तसेच मुंबईकडे प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने खजिनदार कुणाल खाकम, उपसचिव सुभाष डिंगणकर, युवा सदस्य प्रथमेश डिंगणकर, अर्जुनदादा आग्रे, दत्ताराम दादा डिंगणकर, संतोष दादा खाकम आणि सचिन झगडे यांच्यासह उपस्थित सर्व प्रवासी व हितचिंतकांचे विशेष आभार मानण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तुकाराम खेतले म्हणाले, “आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत चाकरमान्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या विशेष बससेवेचे प्रवासी आणि हितचिंतकांकडून कौतुक करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें