पोट फुगंल्याने अस्वस्थ चिमुकलीचा रुग्णालयात नेताना मृत्यू साडेचार महीन्याच्या निर्वीचा दुदैवी अंत

पोट फुगंल्याने अस्वस्थ चिमुकलीचा रुग्णालयात नेताना मृत्यू साडेचार महीन्याच्या निर्वीचा दुदैवी अंत

प्रतिनिधी (मंगेश जाधव)-

पोटात गँस झाल्याने अस्वस्थ झालेल्या अवघ्या साडेचार महीन्याच्या चिमुकलीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली. निर्वी निलेश भुवड (वय. 4महीने 15दिवस रा. नांदगाव ता. चिपळूण )असे चिमुकलीचे नाव आहे या घटनेची नोद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार निर्वी हिच्या पोटात गँस होत असल्याने 16सप्टेंबर रोजी तिच्यावर चिपळूण येथील डाँ. मनीयार यांच्याकडे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ती आई वडीलांसोबत तीच्या आजोळी गुहागर तालुक्यातील तळवली आगरवाडी येथे गेली होती दरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास निर्वी रडू लागल्याने तिच्या वडीलांनी पाहीले असता तिचे पोट फुगंल्याचे निदर्शनास आले त्यानंतर तिला स्थानिक डाँक्टर आशिष चौगुले यांच्याकडे दाखविण्यात आले. प्रकृती लक्षात घेता चिमुकलीला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डाँक्टरांनी दिला त्यानुसार 16सप्टेंबर रोजी पहाटे साडेबारा वाजता तळवली येथून निर्वीला घेऊन कुटुंबीय निघाले पहाटे दिडच्या सुमारास तिला उपजिल्हा रुग्णालय कामथे ता. चिपळूण येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर निर्वी हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोद आकस्मिक मृत्यू भारतीय नागरिक सुरक्षा सहीता (BNSS)कलम 194अन्वये करण्यात आली आहे निर्वीच्या मृत्यूचे नेमके कारण अध्याप स्पष्ट झालेले नसून गुहागर पोलीसांकडून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें