पंचायत समिती (शिक्षण विभाग), गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

highlits

पंचायत समिती (शिक्षण विभाग), गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

गुहागर : पंचायत समिती (शिक्षण विभाग), गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण नुकतेच उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीविषयी शास्त्रीय माहिती, स्वच्छता, योग्य आहार, आरोग्याची काळजी तसेच मासिक पाळीशी संबंधित गैरसमज दूर करणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.

 

या प्रशिक्षणामध्ये सौ . नीता कांबळे मॅडम, DIET अधिव्याख्याता, रत्नागिरी, तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. रायचंद गळवे साहेब, पंचायत समिती, गुहागर यांच्या मार्गदर्शनातून प्रशिक्षणाला दिशा मिळाली. तसेच आबलोली बीटच्या विस्तार अधिकारी सौ .सारिका शिंदे मॅडम यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यामध्ये मोलाचे योगदान लाभले.

 

प्रशिक्षणामध्ये साधन व्यक्ती म्हणून सौ . नमिता वैद्य मॅडम, न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे; सौ . रिया पालशेतकर मॅडम, श्री देवगोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर; सौ . श्वेता कदम मॅडम, चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय, आबलोली; सौ .स्वाती कणसे मॅडम, श्रीमती र. पा. पालशेतकर माध्यमिक विद्यालय, पालशेत; तसेच श्री. संजय वाघ सर, जि. प. शाळा, पाचेरी सडा नं. १ यांनी सहभाग घेतला.

 

या सर्व साधन व्यक्तींनी दोन दिवसांच्या ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये मासिक पाळीचे शास्त्रीय कारण, मासिक पाळीतील स्वच्छता व व्यवस्थापन, योग्य आहार, शरीराची घ्यावयाची काळजी, मानसिक आरोग्य तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या पद्धती याबाबत अभ्यासपूर्ण व प्रभावी मार्गदर्शन केले.

 

प्रशिक्षणामुळे शिक्षकांना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय व अद्ययावत माहिती मिळाली असून, ही माहिती विद्यार्थिनींपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्यास मदत होणार आहे. मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वच्छतेच्या सवयी आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले.

 

या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ . चव्हाण मॅडम, न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे तसेच श्री. चंद्रकांत बेलेकर सर, जि. प. शाळा, जानवळे नं. १ यांनी इंटरनेट व बसण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे करून मोलाचे सहकार्य केले. तसेच तंत्रस्नेही श्री. ओंकार डेरवणकर सर यांनी तांत्रिक बाबींमध्ये मोलाचे योगदान दिले.

प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, शिक्षक व संबंधितांचे पंचायत समिती, गुहागर यांच्या वतीने सौ . नमिता वैद्य मॅडम यांनी आभार मानून सर्वांना धन्यवाद दिले. त्यानंतर माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. रायचंद गळवे साहेब यांच्या परवानगीने प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें