सोशल मीडियावरिल चॅटिंगवरून 82 टक्के दिव्यांगाला त्याच्या कंपनीत घुसून बेदम मारहाण, गुन्हा दाखल

*सोशल मीडियावरिल चॅटिंगवरून 82 टक्के दिव्यांगाला त्याच्या कंपनीत घुसून बेदम मारहाण, गुन्हा दाखल*

*तीन महिला, आणि दोन पुरुष यांनी मिळून केली बेदम मारहाण, CCTV फुटेज पोलिसांच्या हाती*

*भारतीय न्याय संहिता BNS २०२३ अन्वये १९८(२),१९१(२),११५(२),३२४(२)आणि अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियन २०१६ अन्वये ९२(b) कलमे लागू

*समिर शिरवडकर रत्नागिरी*

रत्नागिरी:-राजापूर तालुक्यातील एका व्हाट्सअप ग्रुप वरती चॅटिंग वरून,एक आक्षेपार्य पोस्ट टाकल्याच्या रागातून काही महिला आणि पुरुषांनी पोस्ट टाकणाऱ्या दिव्यांग इसमाच्या कंपनीत जाऊन त्याला लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार कारवांचीवाडी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी यांच्याकडे दाखल झालेलाआहे.
सविस्तर वृत्त असे की,दि.०६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दहाच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुप वरती तक्रारदार श्रीकृष्ण देविदास शिर्सेकर यांनी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्ट वरती काही कमेंट्स होऊन,ती पोस्ट त्या ग्रुप वरुन डिलीट करुन तशी जाहीर माफी सुद्धा मागितली होती. परंतु वैयक्तिक वादाच्या रागाने त्याला त्याच दिवशी एकत्रित मिळून रत्नागिरी मधील एका ठिकाणी बोलावून मारण्याचा कट आरोपींनी केला होता, परंतु तक्रारदार बोलिवल्या ठिकाणी आले नसल्याने त्या दिवशी मारण्याचा कट टळला, मात्र दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी ठीक सकाळी ११.३० वाजता आरोपीनि जैतापूर वरून MH08BN0757 निळा रंग चार चाकी गाडी घेऊन रत्नागिरी एम.आय.डी.सी. येथील तक्रारदार श्रीकृष्ण देवदास शिर्सेकर यांच्या जे त्या ठिकाणी काम करतात त्यांच्या कंपनीत जाऊन लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने एक व्हिडिओ सुद्धा करून घेतला भीतीने आणि तो व्हिडिओ करण्यास परवानगी दिली. मारहाणी मध्ये खूप दुखापत झाली असून त्यांची रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल करण्यात आलेली. तक्रारदार श्रीकृष्ण देविदास शिर्सेकर हे ८२ टक्के विकलांग असल्याकारणाने त्यांच्यावरती अपंग व्यक्तीचे अधिकार 2016 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन कारवांचीवाडी यांनी उशिरा रात्री दहा वाजता संबंधित आरोपी सिद्धि विनायक शिर्सेकर शशांक विजय शिरवडकर,साक्षी शशांक शिरवडकर, राहुल जगदीश करगुटकर, सर्व राहणार जैतापूर आणि एक अनोळखी महिला यांच्या विरोधात भारतीय न्यायसहिता 2023 अंतर्गत 189(2) 191(2),198(2), 115(2),आणि अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 अन्वये 92(b) अशा पद्धतीने वरील आरोपी वरती गुन्हा दाखल झालेला,असून पुढील तपास पी.आय.पालवे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें