एनसीसी विभागाच्या “कोकण ज्ञान तरंग” नौकानयन मोहिमेला तवसाळ येथे उपसभापती निलेश सुर्वे यांनी झेंडा दाखवून दिल्या शुभेच्छा.

*एनसीसी विभागाच्या “कोकण ज्ञान तरंग” नौकानयन मोहिमेला तवसाळ येथे उपसभापती निलेश सुर्वे यांनी झेंडा दाखवून दिल्या शुभेच्छा.

*जि.प.आदर्श शाळा तवसाळ येथे एनसीसी छात्रानी विद्यार्थी व ग्रामस्थांचे केले पथनाट्यातून प्रबोधन

*अनेक वर्षांनी जयगड खाडीमध्ये झाले शिडांच्या होडीचे दर्शन.

आबलोली (संदेश कदम)

२१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी एनसीसी द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “मेन्यू २७” खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेला प्रारंभ झाला.रविवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी या मोहिमेला गुहागर तालुका पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे यांनी तवसाळ प्रवासीजेटी वरती झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या व या मोहिमेचा प्रारंभ झाला. अनेक वर्षांनी या एनसीसी कोकण ज्ञान तरंगच्या सागरी प्रवासामुळे जयगड खाडीमध्ये शिडांच्या होडींचे दर्शन झाले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधानही व्यक्त करण्यात आले . संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या ६० उत्कृष्ट एनसीसी नवोदल कॅडेट्सनी जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ येथे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून मोबाईलचा अतिवापर, मुलगा आणि मुलगी समानता, अत्याधुनिक शिक्षण व्यसन मुक्ती, सोशल मीडियाचा अतिवापर याबाबत सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये प्रबोधन केले. यावेळी मालगुंड विद्यालयाचे केळकर सर यांनी या मोहिमेचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पटवून दिले.ग्रामस्थांच्या वतीने श्री केळकर सर व एनसीसी विभागाचे श्री निशांत खताळ सर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व या धाडसी मोहिमेवर निघालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने उपसभापती निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जयगड विद्यालयाचे पाटील सर, तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सुर्वे, राजेश सुर्वे,विज्ञान सुर्वे, मुख्याध्यापक खंडगावकर सर, शाळेच्या माजी विद्यार्थिनी व आता सिव्हिल इंजिनियर असणा-या ऋतुजा सुर्वे, सायली सुर्वे, मोहसीन जांभारकर,तौफिक जांभारकर, अनिस जाभांरकर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेणारे गावातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री जगदीश गडदे यांनी केले होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें