आरेगावचे सुपुत्र विनोदी अभिनेते आदेश घडवले यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित

आरेगावचे सुपुत्र विनोदी अभिनेते आदेश घडवले यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित

 

प्रतिनिधी (मंगेश जाधव)-

गुहागर तालुक्यातील आरेगावचे सुपुत्र विनोदी अभिनेते आदेश घडवले यांना नुकताच विरार येथील दैनिक जन पहारा यांच्या वतीने कलारत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. आदेश घडवले हे टिव्ही मालिका वेबसिरीज नमन नाटक अशा अनेक कला क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे ते सध्या मराठी सिरीयल स्टार प्रवाह चैनलवरील ठरलं तर मग या सिरीयल मध्ये चंदू ही भूमिका साकारत आहेत उत्तम मिमिक्री कलाकार आहेत त्यामुळे त्यांची कलाक्षेत्रात घट नाळ जोडली गेली आहे. त्यांना कला क्षेत्रात येण्यासाठी अनेक कलाकार मित्र दिग्गज कलाकारांचा चांगल्या प्रकारे पाठबळ मिळाले आदेश घडवले यांनी अनेक मालिका नाटकामध्ये आपल्या अभिनयाची छाप उमठविली आहे म्हणून याच कामाची पोचपावती म्हणून विरार येथील दैनिक जन पहाराचे जितेंद्र शिंदे व दिपक मांडवकर यांनी दखल घेऊन मानाचा समजला जाणारा कलारत्न पुरस्कार देऊन विनोदी अभिनेते आदेश घडवले यांना सन्माननित करण्यात आले. या पुरस्कारामुळे गुहागर वासियांकडून विनोदी अभिनेते आदेश घडवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें