राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तरुणांनी जपला माणुसकीचा धर्म; वृद्ध आजींना सुखरूप पोहोचवले घरी!

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तरुणांनी जपला माणुसकीचा धर्म; वृद्ध आजींना सुखरूप पोहोचवले घरी!

आर्यन वराडकर, वेदांत पडवळ आणि रुद्र पाटील यांचा माणुसकीचा पुढाकार; उन्हात असहाय्य अवस्थेत बसलेल्या आजींना दिला मदतीचा हात

गुहागर | प्रतिनिधी (मंगेश जाधव)

सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना गुहागर तालुक्यात घडली. घराचा रस्ता विसरलेल्या आणि उन्हात असहाय्य अवस्थेत बसलेल्या एका वृद्ध आजींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तरुणांनी मदतीचा हात देत सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले.

गुहागर येथील सरकारी रुग्णालयाजवळील रस्त्यावर एक वृद्ध आजी उन्हात एकट्याच बसलेल्या काही तरुणांच्या निदर्शनास आल्या. त्या आपल्या घराचा रस्ता विसरल्या होत्या. तसेच त्यांना व्यवस्थित चालताही येत नव्हते. ही बाब लक्षात येताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर्यन वराडकर, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वेदांत पडवळ आणि रुद्र पाटील यांनी तत्काळ आजींची विचारपूस केली.

या तरुणांनी आजींना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी बिस्किटे देत धीर दिला. त्यानंतर त्यांच्या घराचा पत्ता शोधून त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गरजू व असहाय्य व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे काम या तरुणांनी केले. त्यांच्या या तत्परतेमुळे वृद्ध आजींना मोठा दिलासा मिळाला.

समाजकार्य हे केवळ पदापुरते मर्यादित नसते, तर गरजेच्या वेळी कोणताही स्वार्थ न ठेवता माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी धावून जाणे, हेच खरे समाजकार्य आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या या तरुणांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा हाच धर्म जपल्याचे या घटनेतून दिसून आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें