पडवेत वाघाची दहशत; रात्रीच्या संचाराने ग्रामस्थांमध्ये घबराट

पडवेत वाघाची दहशत; रात्रीच्या संचाराने ग्रामस्थांमध्ये घबराट

नवानगर मुस्लिम मोहल्ला ते सुर्वे चायनिज सेंटर परिसरात वाघाचे दर्शन; वनविभागाकडे तातडीच्या बंदोबस्ताची मागणी

गुहागर – (सुजितसुर्वे)

: तालुक्यातील पडवे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाने उच्छाद मांडला असून, त्याच्या रात्रीच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाने परिसरातील गुरेढोरे तसेच कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना भक्ष बनवल्याच्या घटना घडल्या आहेत.

आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरही वाघाचा रात्रीचा वावर सुरूच आहे. काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पडवे येथील नवानगर मुस्लिम मोहल्ला ते सुर्वे चायनिज सेंटरच्या आसपास वाघ अनेकांना दिसून आला. या घटनेमुळे त्या भागात वावरणाऱ्या ग्रामस्थांमध्ये आणि महिलांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

सध्या नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. संभाव्य मोठा अनर्थ टाळण्यासाठी वनविभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी, पिंजरा लावावा आणि ग्रामस्थांचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें