सर्पमित्र अक्षय कदम यांच्या तत्परतेने बिनविषारी सापाला जीवदान

सर्पमित्र अक्षय कदम यांच्या तत्परतेने बिनविषारी सापाला जीवदान

इसवलीतील कोंडवाडीत आग्रे यांच्या घराच्या आवारातून सुरक्षित सुटका

लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण :

इसवली येथील कोंडवाडी परिसरातील आग्रे यांच्या घराच्या आवारात बिनविषारी साप आढळून आल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच गावातील सुपुत्र व सर्पमित्र श्री. अक्षय रवींद्र कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.

घराच्या परिसरात साप दिसल्यानंतर आग्रे कुटुंबियांनी कोणतीही हानी न करता सर्पमित्राशी संपर्क साधला. अक्षय कदम यांनी कौशल्याने व सुरक्षितरीत्या सापाला पकडून तो बिनविषारी असल्याची खात्री दिली. या कामगिरीमुळे आग्रे कुटुंबियांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

आपल्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे सापाला जीवदान मिळाल्याबद्दल आग्रे परिवाराच्या वतीने सर्पमित्र श्री. अक्षय रवींद्र कदम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें