बॉक्साईटची वाहतूक करणारा भला मोठा ट्रक पांगारी येथे रस्त्याच्या खाली गेला, सुदैवाने जीवितहानी टळली

*बॉक्साईटची वाहतूक करणारा भला मोठा ट्रक पांगारी येथे रस्त्याच्या खाली गेला, सुदैवाने जीवितहानी टळली


आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी आबलोली मार्गावर गुहागर तालुक्यातून कर्नाटक येथे मोठ्या प्रमाणात बॉक्साइटची वाहतूक होत असते ही वाहतूक रात्री मोठ्या प्रमाणात होत असते. गुहागर तालुक्यातील पांगारी वनेवाडी येथे जुगाई देवळासमोरील अवघड वळणावर चिपळूणहून येणारा आणि आबलोली,मार्गे काताळे येथे बॉक्साइटचा दगड लोड करण्यासाठी जात असता. गुहागर तालुक्यातील पांगरी येथे जुगाई मंदिर देवळा समोरील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याखाली घसरला आहे. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी घडली नाही. परंतु एक तर झोपेमध्ये किंवा माध्यपान केल्यामुळे चालकांचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटले असावे आणि हा प्रकार घडला असावा.अशी ग्रामस्थांची जोरदार चर्चा आहे. हा प्रकार रात्री 11 :45 वाजताच्या दरम्यान घडला आहे. गुहागर तालुक्यातील काताळे येथून मोठ्या प्रमाणात कर्नाटक येथे बॉक्साईट वाहतूक होत असते.अवजड वाहतूकीमुळे रस्त्याची दुर्दशा होत आहे. त्याला जबाबदार कोण?असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें