चिपळूण तालुकास्तरीय ५४ व्या विज्ञान प्रदर्शनात अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य विभागात पटकावला प्रथम क्रमांक; सलग तीन वर्षे यशाची परंपरा कायम

चिपळूण तालुकास्तरीय ५४ व्या विज्ञान प्रदर्शनात अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य विभागात पटकावला प्रथम क्रमांक; सलग तीन वर्षे यशाची परंपरा कायम

दुर्गम केरेटोक शाळेतील शिक्षक सुधीर उकार्डे यांचे विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश!

सुजित सुर्वे – वार्ताहर 

चिपळूण : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद आदर्श शाळा केरेटोक येथील शिक्षक श्री. सुधीर कृष्णा उकार्डे यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि शैक्षणिक कौशल्याच्या जोरावर विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२६-२७ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिपळूण तालुकास्तरीय ५४ व्या विज्ञान प्रदर्शनात त्यांनी अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या विभागात सादर केलेल्या साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

 

जिल्हा परिषद आदर्श शाळा केरेटोक, केंद्र कळंबट, बिट वहाळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे कार्यरत असलेले श्री. उकार्डे हे गेल्या अनेक वर्षांपासून विज्ञान प्रदर्शनात सातत्याने सहभागी होत आहेत. त्यांच्या शैक्षणिक साहित्याची यापूर्वी अनेक वेळा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या विभागात त्यांनी सलग तीन वर्षे यश संपादन करून आपल्या गुणवत्तेची आणि सातत्याची छाप उमटवली आहे.

 

अत्यंत दुर्गम भागातील शाळेत कार्यरत असूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी ते सातत्याने नवनवीन शैक्षणिक साहित्याची निर्मिती करीत आहेत. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षकांची कल्पकता, मेहनत आणि शिक्षणाप्रती असलेली तळमळ दिसून येते.

 

या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. एरनक साहेब, श्री. देसाई साहेब, सह्याद्री संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. एरनक साहेब यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना सुधीर उकार्डे सर.

 

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण केंद्राच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

दुर्गम भागात काम करतानाही गुणवत्तेचा ध्यास आणि नावीन्यपूर्ण विचारांच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठता येतात, हे सुधीर उकार्डे सरांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.

 

 

—

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

5
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें