राजापूर तालुक्यातील आधार केंद्र किट वाटपावरून खळब संभ्रम?; उन्हाळे येथील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकाचा अन्यायाचा आरोप
रत्नागिरी: एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या आधार केंद्र किट वाटप प्रक्रियेत नियमांची पायमल्ली करून आपल्यावर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप उन्हाळे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालक अमित आत्माराम मोंडे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्दे:
* अर्जांची संख्या व निकष: जाहिरातीतील मुद्दा क्रमांक २२ नुसार एका केंद्रासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास मागील सहा महिन्यांच्या व्यवहाराचा तपशील विचारात घेतला जाईल असा आहे.ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत उन्हाळे येथील केंद्राची व्यवहार संख्या ‘३१०’ आहे, तर अभिषेक गजानन सप्रे यांच्या ससाळे येथील केंद्राची व्यवहार संख्या ‘१११’ आहे . असे असतानाही आपले सरकार सेवा केंद्र उन्हाळे व आपले सरकार सेवा केंद्र ससाळे यांची तुलना केली असता आपले सरकार सेवा केंद्र उन्हाळे १९९ ने जास्त आहे या इथे त्यांचा विचार करणे बंधनकारक होते. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता तुम्ही त्या महसूल मंडळात मोडत नाही असे उत्तर देऊन त्याची दिशाभूल करत आहेत. जाहिरातीतील मुद्दा क्रमांक ५ हे सांगतो की ज्या महसूल मुख्यालय ठिकाणी आधार किट मंजूर करावयाचे आहे त्याच तालुक्यातील समावेश असलेल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज करावेत. हे स्पष्ट म्हटले आहे. आणि उन्हाळे गावाचा समावेश राजापूर तालुक्यामध्ये येतो
* शैक्षणिक पात्रता व स्थळाबाबत प्रश्नचिन्ह: माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक सप्रे यांचे केंद्र ससाळे गावी मंजूर असून त्यांनी अर्जात ‘CCC’ शैक्षणिक पात्रता नमूद केली आहे, जी अर्जातील नमूद पात्रतेपेक्षा वेगळी असल्याचा आरोप निवेदनात आहे. अर्जामद्दे आपले सरकार सेवा केंद्र ससाळे चे अक्षांश-रेखांश (१६.५९७५३६, ७३.६५५१३३) नमूद आहे हे केळवली येथील ते चालवत असलेल्या खासगी ऑफिसचे आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाने अभिषेक सप्रे यांना केंद्र ससाळे ऐवजी केळवली येथे चालवण्यास परवानगी कशी दिली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
* माहिती अधिकार व कारवाईची मागणी: माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेली माहिती आणि प्रथम अपील सुनावणीनंतरही १५ दिवसांत कागदपत्रे देण्यात अधिकारी वर्ग टाळाटाळ करत असल्याचे मोंडे यांनी म्हटले आहे. जाहिरातीतील मुद्दा क्रमांक ७, १० व १५ नुसार चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद करून कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असतानाही अभिषेक सप्रे यांना यांना मंजुरी कशी मिळाली या बाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी निवासी उपजिल्हाधीकारी यांना अभिषेक सप्रे यांना दिलेली मंजुरी रद्द करून, २७ एप्रिल २०२६ रोजी दाखल केलेल्या आपल्या अर्जाचा विचार करत न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तांत्रिक/प्रशासकीय टीप: यां प्रकरणी प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













