शृंगारतळी येथे जेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांचे हस्ते शिवसेना कार्यालयाचे जल्लोषात उदघाटन संपन्न..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शृंगारतळी येथे जेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांचे हस्ते शिवसेना कार्यालयाचे जल्लोषात उदघाटन संपन्न..! छाया – संदेश कदम

मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपुल (दादा) कदम यांच्या गुहागर दौ-याने शिवसेनेत जल्लोष..!

शृंगारतळी येथे जेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांचे हस्ते शिवसेना कार्यालयाचे जल्लोषात उदघाटन संपन्न..!

आबलोली (संदेश कदम)……
गुहागर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपूल (दादा) कदम यांनी नुकताच गुहागर तालुक्याचा दौरा केला आणि शिवसेना पक्षात एकच जल्लोष साजरा करण्यात आला जेष्ठ आणि युवा,महिला – पुरुष कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये विपुल (दादा) कदम यांच्या गुहागर दौ-याने अंगात उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले त्याचे कारण होते की, गुहागर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या आणि तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शृंगारतळी येथे विपुल (दादा) कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांच्या शुभहस्ते शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे मोठ्या जल्लोषात उदघाटन झाले आणि शिवसैनिकांनी जय भवानी,जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय..! हिंदु हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, धर्मविर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांचा विजय असो..! अशा गगनभेदी घोषणा शिवसैनिकांनी दिल्या आणि फटाक्यांची आतिषबाजी करुन शृंगारतळी बाजारपेठेत एकच जल्लोष झाला. सर्व सामान्य शिवसैनिकांची आणि जनतेची विकास कामे करण्यासाठी आणि अडी – अडचणी सोडविण्यासाठी शृंगारतळी येथे जेष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांचे शुभहस्ते शिवसेनेची शाखा उघडली असल्याचे तरुण तडफदार शिवसेनेचे युवा नेतृत्व विपुल (दादा) कदम यांनी जाहीर केले आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन धन्यवाद दिले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन दीपप्रज्वलन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे तालुका सचिव संतोष आग्रे यांनी केले तर शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांनीहि यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने विपुल (दादा) कदम आणि उपस्थित शिवसैनिकांचा शाल, श्रीफळ आणि भुफे देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी विपुल (दादा) कदम, जेष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे,शिवसेना पक्षाचे पक्षाचे पक्ष निरिक्षक अनुराग उतेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, तालुका सचिव संतोष आग्रे, अमरदिप परचुरे, रोहन भोसले, निलेश मोरे, महेश तावडे, बबलू आग्रे, राजेंद्र उर्फ राजा साळवी, सागर काजरोळकर, सरपंच प्रकाश भोजने, काशिनाथ भोजने यांचेसह शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते महिला – पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam