परप्रांतीय व फेरीवाले यांच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये कराव्यात.- जानवळे सरपंच यांना निवेदन.

मनसेचे जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत सदानंद कोळंबेकर यांचे सरपंच यांना निवेदन..! छाया – सन्देश कदम

परप्रांतीय व फेरीवाले यांच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये कराव्यात..!

मनसेचे जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत सदानंद कोळंबेकर यांचे सरपंच यांना निवेदन..!

आबलोली (संदेश कदम) …..

परप्रांतीयांच्या व फेरीवाले यांच्या नोंदी जानवळे ग्रामपंचायत मध्ये कराव्यात अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत सदानंद कोळंबेकर यांनी जानवळे सरपंच जान्हवी विखारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या मागणी नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी परप्रांतीयांचे नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यात विविध क्षेत्रात परप्रांतिय कार्यरत आहेत. त्या सर्वांची आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील त्यांचे आधारकार्ड पाहून त्याचे फोटो काढून व इतर महत्वाच्या कागदपत्रांची चाचपणी करुन त्यांची आपल्या दप्तरी नोंद करण्यात यावी. आणि हे परप्रांतीय मजुर कोणासाठी काम करतात ते कुठे राहतात याचीही तपासणी करुन त्याचीही नोंद ठेवावी. जेणेकरुन संभाव्य गुन्हे टळू शकतील तसेच फेरी वाल्यांना गावात फिरण्यास बंदी करण्यात यावी असे गाव बंदीचे फलक लावण्यात यावे.येत्या १५ दिवसात या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षा शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर यांनी केली आहे. उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी विजय शिंदे, सचिन कोळंबेकर,शुभम बैकर, साईराज बैकर, शैलेश आग्रे, हेमंत चिवेलकर,अमित कोळंबेकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें