गुहागर विधानसभेत सर्वसामान्यांचा चेहरा कोण? हा निर्णय वरिष्ठ घेतील – विपुल (दादा) कदम यांची पत्रकार परिषदेत स्पष्टोक्ती.

गुहागर विधानसभेत सर्वसामान्यांचा चेहरा कोण? हा निर्णय वरिष्ठ घेतील – विपुल (दादा) कदम यांची पत्रकार परिषदेत स्पष्टोक्ती..!

आबलोली (संदेश कदम) ….

गुहागर – शिवसेनेचा गुहागर विधानसभेतील सर्व सामान्यांचा चेहरा कोण? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हा सर्वस्वी निर्णय पक्ष प्रमुख मुख्यमंत्री नाम. एकनाथजी शिंदे साहेब आणि वरिष्ठांचा असल्याचे एकनाथजी शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे आणि शिवसेनेचे तरुण तडफदार युवा नेतृत्व विपुल (दादा) कदम यांनी गुहागर येथील शांताई रिसॉर्ट येथे पत्रकारांशी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे (शिवसेना शाखेचे) उदघाटन जेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गुहागर मोडका आगर येथील शांताई रिसॉर्ट येथे विपुल (दादा) कदम हे पत्रकारांशी पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की मी संघटना वाढीसाठी गुहागरच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलो आहे येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आंम्ही शृंगारतळी येथील शिवसेनेच्या नविन शाखेतून गोर – गरीब जनतेचे, शिवसैनिकांचे प्रश्न सोडवीणार आहोत.तसेच या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट कशी होईल बेरोजगारी कशी दूर होईल याकडे आमचे प्रयत्न रहाणार आहेत गुहागर विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारी लढवावी हि माझ्यावरती प्रेम करणा-या कार्यकर्त्यांची इच्छा असू शकते. परंतू मी संघटना वाढीसाठी खूप काम करणार आहे येथील संघटनेला बळ देण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न तात्काळ कसे सोडवता येतील यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे तसेच रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. मी कुणाचा नातेवाईक आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू नका इथल्या उमेदवारीचा सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महायुतीच्या घटक पक्षांचा आहे त्यामुळे यावर भाष्य योग्य नाही असे स्पष्ट मत पत्रकारांशी बोलताना विपुल (दादा) कदम यांनी केले.

यावेळी विपुल (दादा) कदम यांचे समवेत शिवसेनेचे पक्ष निरिक्षक अनुराग उतेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, सचिव संतोष आग्रे, अमरदिप परचुरे, रोहन भोसले, गुहागर शहराध्यक्ष निलेश मोरे, महेश तावडे, बबलू आग्रे, राजेंद्र उर्फ राजा साळवी, सागर काजरोळकर, सरपंच प्रकाश भोजने, काशिनाथ भोजने यांचेसह शिवसैनिक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका सचिव संतोष आग्रे यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले तर तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांनी प्रस्तावना केली

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें