सीरियामध्ये परिस्थिती चिंताजनक; राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे देशातून पलायन; बंडखोरांनी घेतला देशाचा ताबा?

 

सीरियामध्ये परिस्थिती चिंताजनक; राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे देशातून पलायन; बंडखोरांनी घेतला देशाचा ताबा?

दमास्कस— सीरियामध्ये सध्या परिस्थिती चिंताजनक आहे. कारण अल कायदाशी संबंधित सुन्नी बंडखोर गट एचटीएसने देशाचा ताबा घेतला आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे रशियात पळून गेले आहेत. या दरम्यान इस्रायलने सीरियाचे लष्करी तळ आणि रासायनिक शस्त्रांचे कारखाने हवाई हल्ले करून नष्ट केले आहेत. ही शस्त्रे बंडखोरांच्या हाती पडण्याची भीती अमेरिका आणि इस्रायलला होती. त्यामुळे दोघांनीही एकत्र कारवाई केली आहे. इस्रायली सैन्याने सीरियात प्रवेश केला. 1974 च्या करारानंतर इस्त्रायली सैन्याने सीरियाच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्त्रायली सैन्याने गोलान हाइट्सजवळ सीरियाच्या 10 किमीच्या आत एक बफर झोन देखील तयार केले आहे.

आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलच्या हवाई दलाने सीरियात घुसून कारवाई केली आहे. हा हल्ला भीषण होता. असद राजवट संपल्याने सीरियातील इराणचा प्रभावही देखील संपला आहे. आता इराण यापुढे सीरियामार्गे लेबनॉनमधील हिजबुल्लाला शस्त्रे पाठवू शकणार नाही. इस्रायलच्या लष्कराने रविवारी सीरियात घुसून 7 लष्करी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये खलखा एअर बेस आणि मिलिटरी बेसचाही समावेश आहे. या हल्लयात सीरियन लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स ऑफिसचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलच्या सूत्रांचा दावा आहे की, इराण सीरियामध्ये शस्त्रास्त्रांची फॅक्टरी चालवत होता. त्याचे तज्ञ येथे क्षेपणास्त्रे विकसित करायचे.

इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, बफर झोन तयार करण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून इस्रायलच्या सीमेला लागून असलेल्या सीरियन गावकऱ्यांना तातडीचा ​​इशारा दिला गेला आहे. जवळपास 50 वर्षांनंतर इस्रायलचं सैन्य सीरियात गेले आहे. ते म्हणाले की, आम्हाला कोणाचेही नुकसान करायचे नाही. सीरियाच्या ग्रामस्थांनी त्यांच्या घरातच राहावे. योम किप्पूर युद्धानंतर इस्रायलने 1974 मध्ये एक करार केला. ज्यानंतर इस्रायलच्या सैन्याने सीरियातून माघार घेतली होती आणि पुन्हा कधीही प्रवेश केला नाही. इस्त्रायली सैनिकांनी आता सीरियाच्या जमिनीवर बफर झोन उतार केले असून त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले आहे की, आम्ही आमच्या सीमेचे प्रथम संरक्षण करत आहोत. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या गोलान हाइट्सला नेतान्याहू यांनी भेट दिली. ते म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी झालेला करार आता मोडीत निघाला असून सीरियन सैनिक त्यांच्या चौक्यांवरून मागे गेलं आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें