पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी येथे उत्साहात संपन्न
जि.प.शाळा काताळे नं. १ या शाळेचे घवघवीत यश

आबलोली (संदेश कदम ) .गुहागर तालुक्यातील पडवे केंद्राच्या हिवाळी क्रिडा स्पर्धा सन २०२४-२५ यावर्षीच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धा जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा तवसाळ तांबडवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या. या भव्यदिव्य केंद्रस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धंत जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा काताळे नं. १ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी येथे उत्साहात संपन्न
खो खो स्पर्धेत मुले मोठ्या गटात उपविजेता ठरले असून लंगडी स्पर्धेत मुलींनी मोठ्या गटात बाजी मारुन विजेता ठरल्या तर उंच उडी स्पर्धेत मोठ्या गटात कु. संस्कृती गजानन बारस्कर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर थालिफेक स्पर्धेत मोठ्या गटात कु. आर्या विनोद बारस्कर हिने व्दितीय क्रमांक पटकावला तसेच धावणे या स्पर्धेत मोठ्या गटात कु. संस्कृती गजानन बारस्कर हिने प्रथम क्रमांक पटकावला लांब उडी स्पर्धेत लहान गटात कु. सेजल बारस्कर हिने व्दितीय क्रमांक पटकावला या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व मुख्याध्यापक तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे आणि स्वरचित कविता सादर करणा-या कु. प्रतिक्षा नितीन बारस्कर हिचे काताळे पंचक्रोशी मधून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.