खोडदे येथे शिवजयंती, शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

खोडदे येथे शिवजयंती, शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

क्षत्रिय मराठा युवा संघ गुहागर आणि सकल मराठा समाज खोडदे- आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम

खोडदे येथे शिवजयंती, शिवजन्मोत्सव

आबलोली (संदेश कदम)
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील खोडदे येथे क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना, गुहागर (रजि.) सलग्न क्षत्रिय मराठा युवा संघ, गुहागर आणि सकल मराठा समाज खोडदे – आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने
खोडदे सहाण येथे शिवजयंती, शिवजन्मोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.सकाळी ०८:०० ते ०९:०० यावेळेत सरपंच कु. पुजा गुरव ,डॉ. सुधाकर साळवी,गजानन शंकर साळवी,सुरेश केशव साळवी,रमाकांत साळवी,वसंत पाटील, राजेंद्र पंढरीनाथ साळवी, विलास गुरव, संदेश साळवी,शरद साळवी, धनदिप साळवी,हरिश्चंद्र साळवी, महादेव लिंगायत,विनायक गुरव, संतोष गुरव, तानाजी साळवी,महेश साळवी, विजय पागडे,शहानंद पवार,प्रमोद साळवी, सुनिती वैद्य, राकेश साळवी,दत्ताराम साळवी, विलास दत्ताराम साळवी,प्रकाश साळवी, आदी. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन, दीपप्रज्वलन करुन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..!जय शिवाजी जय भवानी,छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर सकाळी ०९:०० ते १०:०० यावेळेत श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर दुपारी ०३:०० ते सायंकाळी ०६:०० यावेळेत खोडदे – आबलोली गावातील आणि पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रात्रौ ०८:०० ते ०९:०० यावेळेत स्थानिक मंडळी यांचा सुमधुर भजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर खोडदे-आबलोली गावातील मुला – मुलींचा विविध गुणदर्शनाचा, रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न झाला.रेकॉर्ड डान्स स्पर्धेत बालवाडी मधील ऐका दाजिबा या गाण्यावर अन्वी रेपाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला तर चिऊताई या गाण्यावर अनुश्री पवार, सुमेधा पवार यांनी व्दितीय तर टुकमूक डोळे या गाण्यावर अनुश्री पवार, अन्वी जाधव, सुमेधा पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर १ ते५ वयोगटातील स्पर्धेत शिवजन्म या गाण्यावर जि. प. शाळा आबलोली नं. १ यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर रघुपती राघव या गाण्यावर श्रेया साळवे हिने व्दितीय तर झाशीची राणी आंम्ही शिवकन्या या गाण्यावर मिरा संतोष गुरव हिने तृतीय क्रमांक पटकावला आणि माझे कोकण भारी या गाण्यावर गार्गी आग्रे, ऊध्दी पवार, उन्नती पवार यांनी चौथा क्रमांक पटकावला आणि मोठ्या गटात फंटास्टिक म्हणतोय मला या गाण्यावर दिक्षा विठ्ठल डिंगणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर हलगी वाजवी या गाण्यावर अक्षरा संदेश सावंत हिने व्दितीय तर मदन मंजिरी या गाण्यावर कार्तिकी रेपाळ, समृध्दी भोजने यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर याच गाण्यावर कोळवली हायस्कूलच्या दिक्षा, सोनाली यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेचे परीक्षण एल. एस. महाकाळ यांनी केले या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश केशव साळवी यांनी केले

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें