शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढ शक्य. . .रायचंद गळवे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढ शक्य. . .रायचंद गळवे

गुहागर -राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू असून शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित केले असून त्यामुळे शिक्षकांची क्षमता बांधणी होऊन शालेय शैक्षणिक गुणवत्ता वाढ होईल ,जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या आमुलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक सक्षम होतील असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब यांनी केले.कनिष्ठ महाविद्यालय अबलोली येथे दुसऱ्या टप्प्यातील तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात सुरू आहे .सदर प्रशिक्षणाला त्यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी सुसंवाद साधला.त्यावेळी केंद्र संचालक तथा अबलोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे साहेब ,गुहागर बीटाचे विस्तार अधिकारी श्री केशव क्षीरसागर साहेब , विषय शिक्षक परमेश्वर लांडे, विषय शिक्षक शिवानंद साखरे तसेच साधन व्यक्ती प्रताप देसले, सुनील गुडेकर ,मनोज पाटील, अर्जुन किन्होळकर ,रविकांत वाकडे ,नितीन जगताप ,पराग कदम, भूषण बागल ,सुनील साळुंखे, विजय पिसाळ ,नरेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020,राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023,राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण 2024,शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन कार्य नीती, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य ,विविध गटकार्य ,समग्र प्रगती पत्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थ्यांची शिस्त व शंभर टक्के उपस्थिती यांचे त्यांनी कौतुक केले.गुहागर तालुका शैक्षणिक गुणवत्ता क्षेत्रामध्ये आघाडीवर राहावा यासाठी सर्व शिक्षकांनी कटिबद्ध राहावे असे त्यांनी आवाहन केले.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात